शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
2
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
3
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
4
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
5
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
6
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
7
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
8
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
9
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
10
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
11
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
12
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
13
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
14
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
15
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
16
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
17
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
18
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
19
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
20
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."

Satara: कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण लवकरच - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 1:54 PM

सुमारे ७० आसनक्षमता असलेली विमान वाहतूक सुरू होणार

कऱ्हाड : कऱ्हाड विमानतळाचा विस्तार करण्यासाठी ४८ हेक्टर जागेची गरज आहे. पैकी ३८ हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. उरलेल्या १० हेक्टरचे भूसंपादन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन येत्या पंधरा-वीस दिवसांमध्ये प्रशासन करण्याचा प्रयत्न करील. तो विषय मार्गी लागल्यानंतर विस्तारीकरणाचे काम पूर्ण होऊन पुढच्या काही महिन्यांत ७० प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानाची वाहतूक येथून सुरू होईल,’ असे मत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आले होते. त्यावेळी ते माध्यमांची बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव डॉ. अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, ॲड. भरत पाटील, रामकृष्ण वेताळ, एकनाथ बागडी, प्रमोद शिंदे उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण देशाचे मोठे नेते आहेत. म्हणूनच कऱ्हाडमध्ये आल्यानंतर त्यांच्या स्मृतिस्थळाला आवर्जून अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. ते नेहमीच आपल्या प्रेरणास्थानी राहिले आहेत.

तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळतेमनसे-उद्धवसेनेच्या वादावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांना छेडले असता, उद्धवसेनेला त्यांनी खोचक टोला लगावला. सुपारी आणि नारळ फेकीवर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘जशास तसे उत्तर मिळते, तुम्ही द्याल ते तुम्हाला मिळते. हे त्यांनी ध्यानात घ्यावे.’मराठा समाजाला महायुतीच सरकार आरक्षण देईलमहाराष्ट्रातील मराठा समाजाला महायुतीच सरकार आरक्षण देईल असा आमचा विश्वास असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण होते. आता पुन्हा राज्यात महायुतीच मराठा समाजाला न्याय देईल.

आता हा भाजपाचा बालेकिल्ला सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. भाजपने येथे आता चांगले यश मिळवायला सुरुवात केली आहे. याबाबत विचारता सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला आहे. महायुतीचे सध्या सहा आमदार आहेत. नजीकच्या काळात सर्वच्या सर्व आमदार हे महायुतीचे असतील असेही मोहोळ यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAirportविमानतळmurlidhar moholमुरलीधर मोहोळ