शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा : शरद पवार

By admin | Published: January 12, 2017 11:45 PM

उदयनराजेंचे नाव न घेता आदेश : शेखर गोरेंचा निकाल जिव्हारी

सातारा : ‘सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघातील पराभवाची कारणमीमांसा करताना मी खोलात गेलो, तेव्हा सांगलीकरांचा ‘प्रसाद’ घेतलेल्यांची यादी माझ्या हाती लागली. ज्यांना आम्ही कष्टाने निवडून आणले, त्या मंडळींचीच नावे यात आढळून आली. तेव्हा यापुढे विरोधकांकडून पैसे घेऊन पक्षाला अडचणीत आणणारे कार्यकर्ते पक्षात नसतील तरी चालेल,’ असे परखड स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केले. तसेच ‘पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा,’ असा स्पष्ट आदेशही खासदार उदयनराजे यांचे नाव न घेता पवार यांनी याच भाषणात दिला.शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी कारखाना डिस्टिलरी-इथेनॉल प्लँटचे आधुनिकीकरण आणि अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन खासदार पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, शेखर गोरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुभाष शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अ‍ॅड. आनंदराव पाटील, पक्षाचे राज्य सरचिटणीस अविनाश मोहिते, राजेश पाटील-वाठारकर यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर खा. पवार यांनी सडकून टीका केली. मोदींच्या निर्णयाचे दुष्परिणाम मोठा काळ सामान्य जनतेला सोसावे लागणार असून, हाच मुद्दा घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सामान्य लोकांना जागृत करा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला. दरम्यान, सातारा जिल्हा परिषद उमेदवार निवडीचे सर्वाधिकार लागलेला ठपका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत धुऊन काढू. यशवंतराव चव्हाण व किसनवीरांच्या जिल्ह्यात आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते तयार झाले, त्या जिल्ह्यात केवळ पैशांच्या आमिषाने विरोधकांना मते देणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. गरिबातला गरीब कार्यकर्ता निवडून आणण्यासाठी सज्ज व्हा.’शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणामेळाव्याचे संयोजक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका मांडली. पक्षाच्या ताकदीवर पदे मिळवून पुन्हा पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रकार थांबला पाहिजे. सातारा तालुक्यातून आम्ही यासंदर्भात घ्यायची ती भूमिका घेतली आहे; पण पक्षानेही याबाबत ठोस भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. तसेच भाऊसाहेब महाराजांच्या काळातील संयमी राजकारण बाजूला ठेवून आम्ही जशास तसे वागायला सज्ज आहोत. कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी माझ्याकडूनही पावले टाकावी लागतील, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.