शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

गोदामातील धान्यावर खादाडांचा डोळा

By admin | Published: May 26, 2015 10:47 PM

ढेबेवाडीत शासकिय धान्याचा काळाबाजार : पुरवठा यंत्रणेसह दलाल, धान्य दुकानदारांची साखळी; लाभार्थ्यांच्या पदरी निराशा

सणबूर : ढेबेवाडी येथील शासकीय गोदामातून प्रतिमहिना हजारो क्विंटल धान्याचा काळाबाजार सुरू असून लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. हा सारा काळाबाजार गोडावून किपरसह पुरवठा विभागाच्या सहकार्याने होत असल्याची चर्चा ग्रामस्थांतून सुरू आहे. संबंधित विभगाचे अधिकारी व कर्मचारी धान्याचा काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे व दलालांचे खरे हितचिंतक आहेत. ढेबेवाडी येथे शासकिय गोदामात होणारा हा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे. ढेबेवाडी विभागाचा परिसर व्यापक आहे. या परिसरातील स्वस्त धान्य दुकानदारांना सोयीनुसार धान्यसाठा उपलब्ध व्हावा या हेतूने शासनाने ढेबेवाडी येथे गोदाम बांधले आहे. या गोडावूनमध्ये गोडाऊन किपर पदाची नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विभागातील स्वस्त धान्य दुकानदारांना या गोडावूनमधून स्वस्त धान्याचा पुरवठा होतो. मध्यंतरी गोडाऊनच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना कऱ्हाडच्या शासकिय गोदामातून धान्यसाठा उपलब्ध केला जात होता. मात्र आता ढेबेवाडीतील गोडाऊनचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पुन्हा विभागातील स्वस्त धान्य दुकानदारांना ढेबेवाडीतून धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या गोडाऊनमध्ये धान्याचा काळाबाजार राजरोसपणे सुरू आहे. काळाबाजार करणारे रॅकेट पुरवठा विभागासमोरील आव्हानच ठरत आहे. स्वस्त धान्य दुकानदार, दलाल, व्यापारी, संबंधित गोडाऊन किपर अशी मजबूत साखळी असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. त्यांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास आहे. त्यातूनच गोडाऊनमधील स्वस्त धान्याचा काळाबाजार होत आहे. विभागातील स्वस्त धान्य दुकानदारांची लायसन्स दलालांच्या ताब्यात आहेत. ते दलाल आपल्या स्वता:च्या वाहनातून प्रतिमहिना स्वस्त धान्य दुकानदारांना धान्यसाठा पोहोच करत असतात.एखाद्या स्वस्त धान्य दुकानदाराची १५ पोती गहू असली तर त्या दुकानदराला दलालांनी फक्त सात पोतीच द्यायची बाकी बाहेर खुल्या बाजारात चढ्या दराने विकायची, असा प्रकार येथे सुरू आहे. हे स्वस्त धान्य दुकानदारांच्या सहमतीने सुरू असल्याची चर्चा आहे. मग एखादा सर्व सामान्य माणूस शिधापत्रिकेवरील धान्य त्या रेशनिंग दुकानदाराके अणावयास जातो. तेव्हा संपले आहे, भरलेच नाही, कोटा कमी आला आहे. अशी उत्तरे मिळतात. पण भरलेला कोटा विभागाच्या सहकार्याने सुरू आहे का ? स्वत:चे खिसे गरम करण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष होत आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. काळाबाजार करणाऱ्यांवर आत्तापर्यंत कोणतीच कारवाई झाल्याचे दिसत नाही.शासन स्वस्त धान्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करत आहे. ढेबेवाडी येथील शासकीय गोदामात प्रतिमहिना लाखो रूपयांचे धान्य येते. सरकार त्यावर लाखो रूपये खर्च करत असावे. प्रत्यक्षात स्वस्त धान्य दुकानदार स्वत:चे खिसे भरत आहेत व सर्वसमान्य जनतेच्या पदरी निराशा येत आहे. या परिस्थितीचे कोणालाच काहीही गांभीर्य नसल्याचे चित्रआहे. परिणामी सायकलवरून फिरण्याची ऐपत नसलेले काही स्वस्त धान्य दुकानदार व संबंधित दलाल आता महागड्या कारमधून फिरत आहेत. दलाल एवढे निर्ढावले आहेत की, दिवसा धान्याचा काळाबाजार सुरू आहे. (वार्ताहर)प्रत्येक महिन्याला धान्याचा जो कोठा येतो त्याची तपासणी केली जाते. त्यामध्य अद्यापतरी फरक जाणवलेला नाही. मात्र, लाभार्थ्यांना काळाबाजार जाणवत असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. तक्रारींचे निरसन करून संबंधितावर योग्य ती कारवाई करू. - रवींद्र सबनीस, तहसिलदार, पाटणउंदीर गायब; पण ‘बोके’ दबा धरूनढेबेवाडीमध्ये असलेले हे गोदाम पुर्वी लहान होते. त्यामुळे येथे धान्याचा साठा कमी प्रमाणात होत होता. तसेच इमारत जुनी व पडकी असल्याने गोदामात उंदरांचाही सुळसुळाट झालेला. उंदरांकडून धान्याची पोती कुरतडली जात होती. तसेच धान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात केली जात होती. अशातच या गोदामाची दुरूस्ती करण्याबरोबरच वाढीव इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला. त्यामुळे गोदामाची इमारत सुसज्ज तसेच मोठी झाली आहे. सध्या गोदामातील उंदीर गायब झालेत; पण ‘खादाड बोके’ येथे दबा धरून बसलेत.