पिंपोडे बुद्रुक : ज्वारी, मका, ऊस यासह इतर पिकांवर अल्पावधीतच प्रादुर्भाव करणाºया अमेरीकन लष्करी अळीची चिंतेमुळे शेतकरी भयभीत झाला आहे. नव्याने उद्भवलेल्या या किडीने शेतकºयाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे, अशी चर्चा शेतकºयांमधून होत आहे.
महाराष्ट्रात प्रथमच अमेरीकन लष्करी अळी म्हणजेच स्पोडोप्टेरा फ्रुगीपडी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही अळी प्रामुख्याने मका, ज्वारी, ऊस, कापूस आदी पिकांवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करत असल्याचे कृषी विभागाच्या अभ्यासातून पुढे आले आहे. जिल्ह्यातील विविध भागांसह कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात ज्वारी, ऊस व त्याखालोखाल मका पिकाची लागवड केली आहे. या बाबींचा विचार करता पिकांवरील अमेरीकन लष्करी अळीने शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या प्रकारच्या रोगराईत पानाचा हिरवा पापुद्रा खाणे, त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडणे, दुसºया व तिसºया अवस्थेत पानाला छिद्रे पडणे, पोंग्यातून एका सरळ रेषेत एकसमान छिद्र होणे, आदी लक्षणे परिसरातील मका या पिकावर दिसू लागल्याने शेतकरी भयभीत झाला आहे.
दरम्यान, परिसरात गेल काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई असूनही मधल्या काळात अगदी मोक्यावर गरजेपुरता पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील ज्वारीचे पीक जोमात आहे. तसेच परिसरातील शेतकºयांना ज्वारीच्या पिकातून चांगल्या आर्थिक उत्पादनाची अपेक्षा आहे. या पडलेल्या अचानकपणे उद्भवणाºया अमेरीकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील शेतकरी व नागरिक चिंताग्रस्त झाला आहे.
तसेच परिसरातील पशुधनासाठी शेतक ºयांनी ही पेरणी केली आहे. मका या पिकावर अमेरीकन अळीचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील पशुधारकांना देखील चारा टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ताकदवान पतंग फवारणीने नष्ट करावेअमेरीकन लष्करी अळीचा पतंग ताकदवान असून, तो एका रात्रीत जवळपास १०० किलोमीटर अंतर पार करू शकतो. तसेच या किडीची प्रजनन क्षमता जास्त आहे. एक मादी तिच्या जीवनक्रमात १ ते २ हजार अंडी घालते. त्यामुळे बाधित क्षेत्रावर या किडीमुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
उपाय : अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पोंगे नष्ट करावेत. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अर्थात पिकनिहाय सीआयबीआरसी मान्यताप्राप्त शिफारशीनुसार फवारणीसाठी थायामेथोक्झाम १२. ६ टक्के अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के हे १२५ मिली प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तालुक्यातील उत्तरेकडील वाघोली, अनपटवाडी परिसरांतील मका पिकावर अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसू येत आहे.