शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

आमदारांना कारखाना वारसाने मिळाला

By admin | Published: February 19, 2017 12:08 AM

दमयंतीराजे : शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता टीका; शेंद्रे गटात प्रचारसभा

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी वडिलांचे छत्र हरपल्यावर केलेला कडवा संघर्ष आणि कष्टातून काढलेला मार्ग तसेच आमदारांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वडिलोपार्जित वारसा या बाबी नकीच मतदारांनी आणि जनतेने तपासल्या पाहिजेत. आमदारांना कारखाना, बँक, बझार, गिरणी वडिलांपासून वारसाने मिळाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. जनतेच्या हिताकरिता संघर्ष करणाऱ्या उदयनराजेंनी कोणाचेही पाठबळ नसताना समाजकारण करताना जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे,’ असे प्रतिपादन ‘नक्षत्र’च्या संस्थापिका दमयंतीराजे भोसले यांनी केले. सातारा विकास आघाडीच्या शेंद्रे गट, गण आणि दरे खुर्द गणातील उमेदवारांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. जकातवाडी, वेचले, भरतगाववाडी, बोरगाव येथे सभा झाली. यावेळी शेंद्रे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ योगेश शिंदे, शेंद्रे गणाच्या उमेदवार मनीषा क्षीरसागर आणि दरे खुर्द गणाचे उमेदवार हणमंत गुरव, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, अ‍ॅड. अंकुशराव जाधव, नगरसेविका स्मिता घोडके, स्रेहा नलवडे, सरपंच सीताबाई पवार, उपसरपंच दीपक देशमुख, बाजीराव बाबर, रवी पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सुनील काटकर म्हणाले,‘सर्वांनी ठरविले होते की उदयनराजे देतील त्या उमेदवाराचे आपण काम करायचे. अधिकृतपणे मला उमेदवारी मिळाली; परंतु दुसऱ्याचे चांगले झालेले न पाहावणारी मंडळींपैकी एकाने अर्ज माघारी न घेता बंडखोरी केली. तथापि, सातारा विकास आघाडीला धोका होऊ नये म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांच्या सांगण्यावरून उमेदवारी मागे घेतली आहे. लोकांनी राजकारणामधील काही संकेत समजून घेऊन आपल्या इच्छा व्यक्त करायच्या असतात. दुसऱ्याला मागे खेचण्याची वृत्ती शेंद्रे गटातील जनता कधीही स्वीकारणार नाही.’यावेळी सर्जेराव मोहिते, दगडू सुतार, विजय पडवळ, उत्तम भोसले, धनराज दौंडे, संजय सणस, संतोष लोंढे, सागर शिंदे, दीपक देवकर, धनंजय सणस, वैभव शिंदे, अमोल कांबळे, प्रसाद शेळके, महेश भोसले, गोविंद देशमुख, सतीश पवार, रवींद्र चव्हाण, भानुदास गोळे, विकास माने, धनाजी शेडगे, हिम्मतराव जाधव, नंदू पोतेकर, बजरंग कदम, संजय पोतेकर,राजेंद्र गोडसे आदी उपस्थित होते. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच दीपक देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) उदयनराजेंचे यश विरोधकांना सहन होत नाहीदमयंतीराजे म्हणाल्या, ‘खासदार उदयनराजेंना कोणाचेही विशेष पाठबळ नाही. त्यांनी पदाची अपेक्षा ठेवून कधी राजकारण केले नाही. नाही तर आजपर्यंत त्यांना अनेकवेळा मंत्रिपदे मिळाली असती. तथापि त्यांनी कोणत्याही पदापेक्षा जनतेच्या मनामध्ये असलेले स्थान याला जास्त महत्त्व दिले आहे. सर्वसामान्य जनतेचा असलेले प्रचंड विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती आहे. जनेतच्या प्रेमाच्या ताकदीवरच उच्चांकी मताधिक्य मिळाले आहे. आणि हेच विरोधकांना सहन होत नाही.’