शिरवळ : दहा ते पंधरा भटक्या कुत्र्यांचे टोळके... भेकराचा पाठलाग करत असताना जीवाच्या आकांताने भेकर दाहीदिशा सैरावैरा पळत सुटले.. ही परिस्थिती एका अवलियाच्या दृष्टिक्षेपात पडताच स्वत:चा जीव धोक्यात घालून भेकराचे लचके तोडणाऱ्या व चवताळलेल्या भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सहीसलामत सुटका केली खरी; पण नियतीच्यापुढे नंदकुमार पवार यांचे प्रयत्न निष्फळ ठरत भेकराचा नंतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वेळ दुपारी अडीचची.. पाचीपांडव डोंगराच्या शिवारात नंदकुमार पवार हे नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन काम करीत असताना अचानकपणे दहा ते पंधरा भटकी कुत्री भेकराचा थरारकपणे पाठलाग करीत असल्याचे नंदकुमार पवार यांच्या निदर्शनास आले. यावेळी संबंधित भेकर हे जीवाच्या आकांताने दाहीदिशा सैरावैरा पळू लागले; मात्र भटकी कुत्री जोरात पाठलाग करीत भेकराला घेरत शरीराचे लचके तोडत असताना नंदकुमार पवार यांनी आपला जीव धोक्यात घालत भेकराची भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. मात्र तरीही भटकी कुत्री नंदकुमार पवार यांच्या अंगावर धावून जात होती.
यावेळी नंदकुमार पवार यांनी जिद्दीने कुत्र्यांना पिटाळून लावले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या व सहसा माणसाच्या सानिध्यापासून लांब पाळणाºया भेकराने देवदूत बनून आलेल्या नंदकुमार पवार यांच्या दिशेने गंभीर जखमी अवस्थेमध्येही धाव घेत कुशीत विसावला. याप्रसंगी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने नंदकुमार पवार यांनी शिरवळचे माजी उपसरपंच आदेश भापकर यांना दूरध्वनीद्वारे घडलेली हकिकत सांगितली. यावेळी नंदकुमार पवार यांनी जखमी झालेल्या व भेदरलेल्या भेकराला पाणी पाजले. यावेळी आदेश भापकर हे आजारी असतानाही त्या अवस्थेत तातडीने घटनास्थळी धाव घेत शिरवळ येथील पत्रकार यांना याबाबतची माहिती दिली.
यावेळी पत्रकार यांनी याबाबतची कल्पना खंडाळा वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षा जगताप यांना दिली. यावेळी हर्षा जगताप या तातडीने घटनास्थळी कर्मचाºयांसमवेत दाखल झाल्या.तत्पूर्वी, गंभीर जखमी झालेल्या भेकराला दुचाकीवरून आदेश भापकर व नंदकुमार पवार यांनी शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी भेकरावर तातडीने उपचार सुरू केले. दरम्यान, उपचार केल्यानंतर संबंधित भेकराला वनविभागातील कर्मचाºयांच्या ताब्यात देण्यात आले असता रात्रीच्या सुमारास भेकराचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यावेळी भेकराचे शवविच्छेदन करीत वनविभागाच्या कर्मचाºयांनी भेकरावर अंत्यविधी केले. यावेळी जीवाच्या आकांताने पळणाºया भेकराचा जीव वाचविण्याकरिता केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असले तरी नंदकुमार पवार व आदेश भापकर यांनी जीव वाचविण्याकरिता केलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहे.
शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत असलेल्या पाचीपांडव परिसरात जीव वाचविण्याकरिता पळणाºया भेकराला वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने भेकराचा मृत्यू झाला. नंदकुमार पवार यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे गंभीर जखमी झालेल्या भेकराचा जीव वाचला असता तर एक जीव वाचविल्याचे मानसिक समाधान मोठ्या प्रमाणात मिळाले असते.- आदेश भापकरशिरवळ येथे ग्रामस्थांच्या प्रसंगाधावनामुळे वाचलेल्या व गंभीर जखमी झालेल्या भेकराचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र भेकराचा दुर्दैवी मृत्यू झाला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित भेकरावर अंत्यविधी करण्यात आले आहे.- हर्षा जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरवळ