शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

दूध दर ढासळल्याने शेतकरी संकटात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:04 PM

गत तीन महिन्यांपासून अचानक दुधाचे दर कमी झाल्याने पशुखाद्य चारा व औषधोपचार याचा खर्चही पदरमोड करून करावा लागत आहे. आज फलटण तालुक्यात गायी व म्हैस अशी जवळपास ९२,००० इतकी जनावरांची संख्या असून, हजारो तरुण दूध व्यवसाय करीत आहेत.

ठळक मुद्देफलटण परिसरातील चित्र : दर ३३ वरून २२ रुपयांवर

लखन नाळे ।वाठार निंबाळकर : दुधाचा दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. गत तीन महिन्यांपूर्वी मिळणारा प्रतिलिटर ३३ रुपये ५० पैसे हा दर आता २२ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.फलटण तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून दुग्धव्यवसाय सुरू केलेला आहे. सर्व काही सुरळीतपणे सुरू होते. गत तीन महिन्यांपासून अचानक दुधाचे दर कमी झाल्याने पशुखाद्य चारा व औषधोपचार याचा खर्चही पदरमोड करून करावा लागत आहे. आज फलटण तालुक्यात गायी व म्हैस अशी जवळपास ९२,००० इतकी जनावरांची संख्या असून, हजारो तरुण दूध व्यवसाय करीत आहेत.

कडवळ व मका या चाऱ्याचा दर प्रतिअडीच गुंठे साडेतीन ते चार हजार रुपये इतका असून, पशुखाद्य १४०० ते १७०० रुपये प्रति ५९ किलो इतका आहे. भुस्सा १२०० रुपये ते १४०० रुपये प्रति ४९ किलोसाठी असा दर आहे. अशा परिस्थितीत एका गायीसाठी प्रतिदिन कमीत कमी २५ किलो चारा, त्यासाठी कडवळ अथवा मका याचा खर्च १४५ ते १५० रुपये, पशुखाद्य कमीत कमी ५ किलो, त्यासाठी ११८ ते १३५ रुपये इतका तर भुस्सा ५ किलो त्यासाठी १२२ ते १४२ रुपये इतका, टॉनिक व इतर औषधे यासाठी ५० रुपये इतका असा प्रतिदिन एका गायीसाठी ४३५ रुपये ते ४७७ रुपये इतका खर्च येत आहे.एक गाय दिवसाला सरासरी १६ ते १८ लिटर दूध देते, त्याचे सध्याच्या २२ रुपये दराप्रमाणे ३५२ ते ३९६ रुपये इतके उत्पादन मिळते. गाय आजारी पडली तर अचानकपणे येणाºया आजारासाठी तीन ते चार हजार रुपये आणायचे कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी शासनाने पूर्वीप्रमाणे ३५ ते ३८ रुपये प्रतिलिटर दूध दर द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

 

दरवाढ न केल्यास आंदोलनाचा इशारा

 

उन्हाळ्यात चारा उपलब्ध नाही, बागायत परिसरातून साडेतीन ते चार हजार रुपये प्रति अडीच गुंठ्यासाठी द्यावे लागत असून, वाहतुकीसाठी वेगळा खर्च होतो आहे. त्यात दुधाचा दर वाढण्याऐवजी कमी झाल्याने पदरमोड करून जनावरे जगवावी लागत आहेत.- नामदेव काळे,शेतकरी, मिरढे, ता. फलटण

 

नोकरीअभावी बँकेचे कर्ज काढून व्यवसाय केला. मात्र, सध्या दर कमी झाल्याने रोजचा तोटा सहन करावा लागत आहे. तातडीने दरवाढ न केल्यास आत्मदहन करणार आहे.- दादासाहेब निंबाळकर,शेतकरी, तावडी

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरी