परिणामी शिवारातील शेतकऱ्यांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, तशी झाली असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. पावसानंतर येथील शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी या बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
ऑक्टोबर महिन्यात येरळेने धारण केलेल्या रौद्र रूपाने बंधाऱ्या शेजारील पाणंद रस्ता पूर्ण खचला असून शिवारातील शेतमाल बाजारात पोहोचविण्यासाठी तसेच यंत्रसामग्री शेतीपर्यंत नेण्यासाठी येथील वाहतूक पूर्ण बंद आहे. त्यामुळे रस्त्याअभावी शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. तसेच अतिवृष्टीत बंधाऱ्याची बाजू वाहिल्याने बंधाऱ्यात वाहत्या पाण्याचा प्रवाहाचा एक थेंबही साठलेला नसल्याने या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीच्या सिंचनाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पाइपलाइन केलेल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आले, ऊस, कांदा, बटाटा व इतर नगदी पिके घेतली आहेत. मात्र, बंधारा कोरडा पडला असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत लगतच्या विहिरी कोरड्या पडून भविष्यात सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रत्येकवेळी करण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या तात्पुरत्या डागडुजीमुळे येरळेला मोठा पूर आला की ही परिस्थिती उद्भवते. त्यामुळे या प्रश्नावर संबंधित विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढून बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
कोट:
प्रत्येक अतिवृष्टीत बंधाऱ्याची उत्तर बाजू वाहून जात असल्याने बंधाऱ्यात पाणी राहत नाही तसेच वाहतुकीचा प्रश्न देखील उपस्थित होतो. यामुळे कृष्णा सिंचन विभागाने बंधाऱ्याच्या संरक्षण भिंतीची रुंदी वाढविण्याची गरज आहे.
-प्रकाश जाधव, माजी उपसरपंच पुसेगाव, जलप्रेमी यशदा पुणे
१०पुसेगाव आटाळी
फोटो: पुसेगाव(ता. खटाव) अतिवृष्टीने आटाळी शिवारातील बंधारा व पाणंद रस्त्याचे नुकसान झालेले आहे. (छाया : केशव जाधव)