कुडाळ : जून महिन्यात माॅन्सून वेळेत दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी उरकून घेतली. शेतातील पीक चांगले आले असून, आता पावसाची आवश्यकता आहे. मात्र, काही आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. माॅन्सूनच्या गायब होण्यामुळे शेतकऱ्यांना पिके करपण्याची भीती वाटू लाजली आहे.
जावळी तालुक्यातील खरिपाच्या पिकांची बहुतांश पेरणी पूर्ण झाली असून, पिकांची उगवणही चांगली झाली आहे. असे असताना गेली आठ दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सध्या मे कडक ऊन पडत असून, पावसाअभावी पिके कोमेजून जात आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. माॅन्सूनचा पाऊस गायब झाल्याने भाताची लागणही लांबणीवर पडली आहे. भाताची रोपे लावणीयोग्य झाली असून, लागणीसाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. भाताची रोपे उन्हामुळे पिवळी पडू लागली आहेत. तालुक्यात पडलेला पाऊस हा पेरणीयोग्य झाला आहे. पिकांच्या वाढीसाठी आता पावसाची नितांत आवश्यकता आहे.
निसर्गाच्या या लहरीपणाचा कायमच शेतकऱ्यांना फटका बसत आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थितीने सर्वजण पुरते ग्रासले आहेत. यातच निसर्गानेही तोंड फिरवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाऊस पडला नाही तर खरीप हंगाम वाया जाईल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
(चौकट)
पावसाअभावी पिके धोक्यात
या वर्षी माॅन्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झाली. यातच मृग नक्षत्राचा पाऊस चांगला होईल, असे वातावरण तयार झाले होते. सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊसही झाला. मात्र गेली आठ-दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शेतात सगळीकडे हिरवेगार पीक डोलत असून, आता पावसाची आवश्यकता आहे. कडक ऊन पडत असल्याने पिके कोमजयला सुरुवात झाली आहे. पाऊस न झाल्यास खरीप हंगामातील पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. भाताच्या लागणीसाठीही शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
०४कुडाळ
फोटो: जावळी तालुक्यात शेतशिवारातील पिके बहरली असून, पावसाअभावी वाया जाण्याची शक्यता आहे.
040721\img_20210703_135813.jpg
बहरलेले शेतशिवर पावसाच्या प्रतीक्षेत आहे.