कोरोना वाढतोय
मायणी : कोरोनामुळे डबघाईला आलेल्या व्यावसायिकांना लग्नसराईत तरी सोन्याचे दिवस येतील, अशी आशा होती. मात्र यंदा दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा ऐन लग्नसराईत होणार असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने व्यावसायिकांच्या आशेवर पाणी फिरू लागले आहे.
कोबी पिकात जनावरे
खटाव : गेल्या काही दिवसांपासून कोबी व टोमॅटोच्या दरांत मोठी घसरण झाल्याने भाजीपाला उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोबी, टोमॅटो व फ्लॉवरला किलोस दोन व तीन रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
अपघाताचा धोका
वाठार-स्टेशन : विखळे (ता. कोरेगाव) गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पुलाच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली असून, या पुलाच्या दुरुस्तीची मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे. पोलादपूर- पंढरपूर राज्यमार्गावर सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे.
मंदिराबाहेर रांगा
सातारा : शहर आणि परिसरातील महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी बहुतेक मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, काही मंदिरांच्या व्यवस्थापनाने शंभू महादेवाच्या मूर्ती गाभाऱ्यात ठेवून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली.
कुंभार यांचा गाैरव
खटाव : पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या सुरेखा कुंभार या कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कोरोना रुग्णांची सेवा करीत असल्याच्या सेवेची दखल घेत जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
महिलांचा सन्मान
सातारा : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिव्यांग प्रेरणा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.