नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळी माण तालुक्याला काही प्रमाणांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी माणगंगा नदीवर दहिवडी हद्दीत ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. दहिवडी परिसरात चांगला पाऊसही झाला, पण बंधाºयाला फळ्या न घातल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे काही शेतकरीच स्वत:हून फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.महाराष्ट्रात २००२-२००३ साली भयानक दुष्काळ पडला होता. जनावरांना छावण्या, लोकांना पिण्याचे पाणी, रोजगार हमीची कामे सुरू होती. त्यावेळी लोकांना आधार देण्यासाठी परिस्थिती पाहण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माणचा दौरा केला होता व पुढे कराड येथील सभेत माण-खटावसाठी तातडीचा निधी म्हणून १० कोटी रुपये मंजूर केले. या निधीतून खटावमधील येरळा व माणमधील माणगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले गेले. ही कल्पना चांगली वाटली, यातून काही प्रमाणांत नदीकाठच्या शेती पाण्याचा प्रश्न मिटेल, म्हणून पुढे दिवंगत सदाशिवराव पोळ, आमदार जयकुमार गोरे, पंकजा मुंढे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून आणखी बंधारे उभे राहिले.यापैकी पळशी व गोंदवले बंधाºयात पाणी चांगल्या पद्धतीने अडले गेले. मात्र, दहिवडी हद्दीतील पाचही बंधाºयांची अवस्था बिकट होत गेली. या ठिकाणी अनेक बंधारे लिकेज राहिले, खरेतर पाटबंधारे खात्याने ते हस्तांतरित करताना लिकेज पाहूनच ताबा घ्यायला हवा होता, पण त्यावेळी लिकेज न पाहताच ताबा घेण्यात आला.पुढे पाणी न साचताच या योजनेवर लिकेज काढण्यासाठी निधी खर्च करावा लागला. आता लिकेज निघाले आहे पण पाणी अडवले गेले नाही. हा प्रशासनाचा गलथान कारभार पाहून शेतकरी त्रस्त झाले आहेत.याच नदीवर पळशी, गोंदवले येथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले आहे. मात्र, दहिवडीतील पाचही बंधाºयांत फळ्या टाकण्याऐवजी ज्या होत्या त्या काढण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे दहिवडी परिसरात चांगला पाऊस पडूनही लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. १५ सप्टेंबरपूर्वी पाणी अडवले जाते. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही, उलट फळ्या काढण्यासाठी अधिकारी आले असता त्यांना नागरिकांनी विरोध केला.अनेकवेळा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बंधाºयाचा उपयोग व्हावा, यासाठी शेतकºयाने लोकवर्गणी काढून दुरुस्ती केली, आता पाणी अडले गेले नाही तर पुन्हा दहिवडी परिसरातील नदीकाठच्या शेतकºयांना पाण्याची समस्या भेडसावणार आहे.२५ तारखेपासून फळ्या काढणारसंबधित अधिकारी सहायक अभियंता उत्तम धायगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पावसाळी वातावरण असल्यामुळे अधिकारी फळ्या काढण्यास गेले होते. २० तारखेला फळ्या टाकण्याची निविदा निघणार असून, २५ तारखेपर्यंत सर्व पाणी अडविले जाईल.
शेतकºयांनीच अडविले अखेर माणगंगेचे पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:58 PM