खंडाळा : खंडाळा तालुक्यात चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बहुतांशी ठिकाणी पेरणीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे खरीपच्या पेरणीत शेतकरी मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे.
खंडाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला; तर तालुक्यात खरीप हंगामात बाजरी, मूग, मटकी, तूर, भुईमूग, सोयाबीन, वाटाणा, घेवडा अशा विविध पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगी, गवार या पालेभाज्यांची लागवडही केली जाते. तालुक्यात सध्या जमिनीची कुळवणी आणि बाजरीच्या पेरणीची लगबग सुरू आहे. तसेच ठिकठिकाणी टोमॅटोला काटेलावणी व बांधणीची कामे सुरू आहेत.
शेतीच्या कामासाठी कुठे परंपरागत बैल व अवजारांचा वापर केला जातो; तर अनेक ठिकाणी आधुनिक यंत्रांचा वापर केला जात आहे. पेरणीनंतर सारा काढणे, सारा ओढण्याच्या कामाचीही लगबग सुरू आहे.
फोटो दि. २४ खंडाळा फार्म फोटो...
फोटो ओळ : खंडाळा तालुक्यात अनेक ठिकाणी टोमॅटोसाठी काटेलावणी व बांधणीचे काम सुरू आहे. (छाया : दशरथ ननावरे)