म्हसवड : ‘आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी आणि कमी श्रमात जादा उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांना माती परीक्षण फायद्याचे आहे,’ असे गाैरवोद्गार कृषिकन्या ऋतुजा जाधव हिने काढले.
कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मालेगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहिवडी (ता. माण) परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी फळबाग, पिकावरील कीड यापासून संरक्षण व पाण्याचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर दुष्काळी भागात कमी पाण्यावर कोणती पिके, फळबागा घ्याव्यात व निगा कशी राखावी, याचेही मार्गदर्शन केले.
यावेळी नितीन भोसले, यशवंत भोसले, कृष्णा गवळी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. ए. राऊत, प्रोग्रॅम ऑफिसर जी. एस. बनसोडे, प्रा. बागल, प्रा. सोनवणे, प्रा. अहिरे, प्रा. गायकवाड यांनीही विशेष मार्गदर्शन केले.
250721\img-20210724-wa0055.jpg
शेतकऱ्यांना मातीपरीक्षण काळाची गरज - कु.ऋतूजा जाधव