शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

गोरेंच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग!

By admin | Published: January 17, 2016 11:14 PM

जिल्हा बँक : आजपासून साताऱ्यात उपोषण

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालकांच्या अधिकारांवरून वादळ उठविणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांनी सोमवार, दि. १८ जानेवारीपासून बँकेचे मुख्य कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आता या आंदोलनात शेतकऱ्यांना सामावून घेऊन या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याची खेळीही त्यांनी खेळली आहे. नाबार्डचे पुरस्कार प्राप्त केलेली आणि राज्याच्या सहकार खात्याने अनेकदा गौरविलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हुकूमशाही पद्धतीने सुरू असल्याचा आरोप आ. गोरे यांनी केला आहे. आमदार जयकुमार गोरे हे स्वत: बँकेचे संचालक आहेत. मात्र, ‘बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, तसेच या बँकेचा कारभार दाखविला जातो, त्या पद्धतीने चांगला चालला नाही,’ असा आ. गोरेंचा आरोप आहे. विषय परस्पर पद्धतीने मंजूर केले जात असल्याने राज्यातील २५ जिल्हा मध्यवर्ती बँका बुडीत निघाल्या, त्याच पद्धतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकही निघेल, अशी भीती आ. गोरे व्यक्त करत आहेत. या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी वर्गालाही केले आहे. आता या उपोषणात आ. गोरेंच्या पाठीशी किती शेतकरी उभे राहतात, हे औत्सुक्याचे ठरले आहे. दरम्यान, सहकारी संस्थेमधील गैरव्यवहाराचा आरोप करत आमदारने उपोषण करण्याची साताऱ्याच्या इतिहासातील बहुधा ही पहिलीच वेळ असल्याने या उपोषणाकडे जिल्ह्याच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)