मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेली काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. शेतात पाणीच पाणी साचल्याने भाजीपाल्यासह भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूला शेतकऱ्यांना अतिपाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून भाजीपाला पिकांचे जतन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा पद्धतीने शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी रोजच सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील बहुतांशी शेतांत पाणी साचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणीसह टोकणीची कामे खोळंबली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी टोकणीसह पेरणीही केली. मात्र सततच्या पावसाने दलदल निर्माण झाल्यामुळे अंतर्गत मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. महामार्ग पश्चिम बाजू व नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. या भागात पेरलेले भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्याच पद्धतीने मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगाव परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय व भेंडी, गवारीसारख्या शेंगवर्गीय भाज्यांची पिके घेतली जातात. सततची रिपरिप सुरू असल्यामुळे पालेभाज्याची पिके रानातच कुजत आहेत. तर अनेक पर्यायकरून जतन केलेल्या पिकांवर ढगाळ वातावरण व धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत आहे. गेली आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे रानात पाणीच पाणी झाल्याने या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चौकट (फोटो आहे.)
पाण्यामुळे उसाची वाढ खुंटली...
नदीकाठचा परिसर म्हटलं की ऊसशेती आलीच. त्यामुळे मलकापूरसह आसपासच्या गावांत उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. अतिपावसामुळे उसाच्या रानात पाणी साचून अनेक ठिकाणी ऊसपीक भुईसपाट झाले आहे. ऊसतोडीनंतर काही शेतकऱ्यांनी खोडवा जतन केला, अशा शेतात गुडघाभर पाणी असल्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. तर काही शेतकऱ्यांनी लागणीसाठी तयार केलेल्या रानात दलदल असल्यामुळे लागणीची कामेही खोळंबली आहेत.
२७मलकापूर
नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
270621\img_20210627_143638.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
महामार्ग पश्चिम बाजू , नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगांव च्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीचपाणी साचल्यामुळे पाण्या-पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया- माणिक डोंगरे)