अरुण पवार, आत्माराम पवार, सीताराम पवार, जगन्नाथ पवार, संभाजी पवार, उमाकांत पवार यांच्या २१ एकर १५ गुंठे जमिनीवर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व गार्डन, लायब्ररी व शेती, रस्ता, हायस्कूल व प्लेग्राउंड अशी विविध प्रकारची आरक्षणे जाणीवपूर्वक टाकण्यात आल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला आहे. या बिकट परिस्थितीत गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे, असे स्पष्ट करीत या कुटुंबीयांनी शेतीचा मोबदला द्या किंवा आरक्षण काढून शेती परत द्या, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी महिला, मुली व लहान मुलांसह सर्व कुटुंबीय सोमवारी पालिकेसमोर उपोषणाला बसले. सायंकाळी ५ वाजता डॉ. अतुल भोसले व अशोकराव थोरात यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले.
यावेळी मलकापूर पालिकेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, नगरसेवक भास्करराव उर्फ आबा सोळवंडे, भारत जंत्रे, अण्णा काशिद, दिनेश रैनाक, राजू मुल्ला, अजित देसाई, दत्तात्रय शिंगण, अरुण पवार, अरुणादेवी पाटील, सारिका गावडे, संजय पवार, विद्यादेवी शिंदे, अॅड. दीपक थोरात, हणमंतराव जाधव, सुरज शेवाळे, सुरेश खिलारे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो :०९ केआरडी१०
कॅप्शन : मलकापूर येथे उपोषणास बसलेल्या पवार कुटुंबीयांना डॉ. अतुल भोसले व अशोकराव थोरात यांच्या हस्ते सरबत देण्यात आला. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.