शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
4
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
5
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
6
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
7
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
8
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
9
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
10
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
11
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
12
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
13
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
14
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
15
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
16
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
17
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
18
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
19
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
20
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

Satara: किन्हईतील महिला डॉक्टर डिजिटल अरेस्ट; ७० लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:23 IST

कोरेगाव : किन्हई, ता. कोरेगाव येथील एका ६५ वर्षीय महिला डाॅक्टरला तुमच्या विरोधात मुंबईमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च ...

कोरेगाव : किन्हई, ता. कोरेगाव येथील एका ६५ वर्षीय महिला डाॅक्टरला तुमच्या विरोधात मुंबईमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या अटकेचे आदेश दिले आहेत. मात्र, आम्ही तुमच्या वयाच्या विचार करून ‘डिजिटल अरेस्ट’ करत आहोत, असे म्हणून अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून कॉल करून सुमारे ७० लाख ९२ हजार ९९३ रुपयांना गंडा घातला.संबंधित डाॅक्टर महिलेस ४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून कॉल केला. मी पोलिस इन्स्पेक्टर हेम्पत्ती कलश, टिळकनगर पोलिस ठाण्यातून बोलत आहे, असे सांगितले. तुमचा एक मोबाइल नंबर मुंबई येथे ॲक्टिव्ह असून, त्यावरून लोकांना अश्लील मेसेज जात आहेत. तुमच्या विरोधात १८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. हा मोबाइल क्रमांक व तुमचे आधार कार्ड क्रमांक अजून कुठे लिंक आहे, हे तपासतो आणि पुन्हा एक तासाने कॉल करतो, असे सांगितले.

त्याच दिवशी परत एक तासाने संबंधित व्यक्तीने फोन करून सांगितले की, मनी लाँड्रिंग केसमध्ये तुमचे आधार कार्ड वापरले गेले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आम्ही तुमच्या वयाचा विचार करून ऑनलाइन डिजिटल अरेस्ट करत आहोत, असे सांगून भीती दाखवली. त्याबद्दल ठरावीक बँक खात्यावर रक्कम पाठवण्यास सांगितले. अज्ञात व्यक्तीने मोबाइल कॉलवरून सांगितल्यानुसार संबंधित महिलेने दि. ६, १० आणि १३ डिसेंबर रोजी वेगवेगळ्या बँक खात्यांवर ‘आरटीजीएस’द्वारे एकूण ७० लाख ९२ हजार ९९३ रुपये पाठवले.संबंधित महिलेने याप्रकरणी आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdoctorडॉक्टरfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस