आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १९ : पावसा अभावी मागील आठवड्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र मागील तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे हे दर अचानक कमी झाले आहेत. गत सप्ताहात २५ रूपयांना असणारी मेथीची पेंडी विक्रीला आता ५ रूपयांना मिळत आहे. मात्र, टोमॅटोचे दर अद्यापही चढेच आहेत. ७० ते ८० रुपए किलो टोमॅटो असल्याने मेथी हसली पण टोमॅटो उद्यापही रूसलेलेच अशी बाजारपेठेती परिस्थिती दिसत आहे. जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात पावसाने मागील तीन चार दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून भाजीपाला अती पाण्यामुळे कुजत आहे. त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वी पुरवून पुरवून काढण्यात येणारी पालेभाजी आता एकदम काढून बाजारपेठेत ठेवली जात आहे. बाजार पेठेत मागणी पेक्षा अधिक भाजीपाल्याची आवक झाली आहे. त्यामुळे मागणी कमी आणि आवक जास्त अशी अवस्था झाल्याने भाज्यांचे दर पावसामुळे अचानक कमी झाले आहेत.
मेथी हसली... टोमॅटो अद्यापही रूसलेलेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:57 PM