पिंपोडे बुद्रुक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना खते खरेदीबाबत अडचण होऊ नये म्हणून कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना बांधावर खत पुरवठा सेवा सुरू केला आहे.
दिवसेंदिवस कोरोना विषाणू संसर्गाची व्याप्ती वेगाने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रसारास अटकाव करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. या स्थितीत खरीप पेरणीपूर्व काळात शेतकऱ्यांची खते, बियाणे खरेदी बाबत अडचण होऊ नये यासाठी कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने शेतकऱ्यांना बांधावरती खत उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्याचा प्रारंभ पिंपरी येथील शाखेतून करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील माने, कोरेगाव तालुका संघाचे चेअरमन भागवत घाडगे, अशोक पवार, वसंत कणसे, कृषी सहायक सुरेखा पवार शहाजी कणसे, पिंपरी सोसायटीचे चेअरमन नानासाहेब पवार, अनंत साबळे, यशवंत चव्हाण, बाबासाहेब भोसले, आबासाहेब पवार, श्रीमंत पवार, सतीश भोसले, बळवंत कणसे, श्रीरंग साळुंखे, उमेश निकम, अरविंद चव्हाण उपस्थित होते.
===Photopath===
250521\img_20210525_175906.jpg
===Caption===
कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शेतकऱ्यांना बांधावर खत पुरवठा करण्यात येत आहे