संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : गणेशोत्सव दहा दिवसांचा असला तरी काही सार्वजनिक गणेश मंडळांना वर्षभर सजग राहावे लागते. मंडळांसाठी लागणाºया वस्तूंसह मौल्यवान दागिने व चांदीच्या गणेशमूर्ती सांभाळण्यासाठी मंडळातील जबाबदार व्यक्ती अक्षरश: तारेवरील कसरत करतात.सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. गणेशोत्सव, दुगार्देवी उत्सव, शिवजयंती असे विविध सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी गावागावांतून गल्लोगल्ली सार्वजनिक उत्सव मंडळांची सध्या रेलचेल झाली आहे. अशा सार्वजनिक मंडळ उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर स्टेज, पडदे, वाद्य व वेगवेगळ्या विद्युत रोषणाईच्या साहित्याची जमवाजमव करावी लागते.
अनेक मंडळाकडे एवढे साहित्य असते की ते कोठे ठेवायचे, असा प्रश्न मंडळातील प्रमुख कार्यकर्त्यांना पडतो. गणेशमूर्तीसाठी विविध प्रकारच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह डोक्यावरील टोप अशा मौल्यवान वस्तू बनविण्याची ‘क्रेझ’ सध्या निर्माण झाली आहे. काही मंडळानी तर तब्बल पन्नास-पन्नास किलो वजनाच्या चांदीच्या गणेशमूर्ती बनविल्या आहेत.चांदीच्या मूर्तींसाठी स्वतंत्र व्यवस्थाचांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणाºया मंडळांसह मौल्यवान दागिने असलेल्या मंडळांना सुरक्षिततेसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागते.अशा मंडळात सुरक्षा रक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागतात. हे दहा दिवसांचे उत्सव संपल्यानंतर चांदीची मूर्ती ठेवण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करावी लागते.शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाची पंचवीस किलो चांदीपासून बनविलेली गणेशमूर्ती आहे. मूर्तीत प्रतिवर्षी चांदी वाढवित अकरा किलोपेक्षा जास्त वजनाचे प्रभावळ आहे. अशी एकूण पस्तीस किलोपेक्षा जास्त वजनाची गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती वर्षभर ठेवण्यासाठी घरातच स्वतंत्र मंदिराची व्यवस्था आहे. प्रत्येक संकष्टीला भाविक दर्शनासाठी येतात.-नितीन काशीद, मलकापूर