शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

Satara Bus Accident: पोलादपूरच्या आंबेनळी घाटातल्या खोल दरीतून आतापर्यंत 14 मृतदेह काढले बाहेर, अंधार पडल्यानं बचावकार्य थांबवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 1:00 PM

Satara Bus Accident: महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक मिनी बस कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत जवळपास सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी दिली.

सातारा/पोलादपूर : महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत किमान सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 प्रवासी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला. प्रकाश सावंत-देसाईअसे बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील पोलीस अन् ट्रॅकर्सचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून, आपत्कालीन विभागाच्या मदतीनं त्यांनी आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढले आहेत. काळोख पडल्यानं आता बचावकार्य थांबवण्यात आलं आहे.   

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील साधारण 34 कर्मचारी महाबळेश्वर येथे विद्यापीठाच्या बसने सहलीला निघाले होते. त्यावेळी पोलादपूर पासून 15 किमी अंतरावर आंबेनळी दरीत बस  कोसळली. या दुर्घटनेत बसमधील 33 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी सुदैवाने बचावला आहे. सध्या घटनास्थळावर मदत करण्यासाठी पोलादपूर पोलीस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसमधून कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी प्रवास करत होते. दरम्यान, ही बस दापोली येथील असल्याचे समजते.

टॅग्स :Bus DriverबसचालकAccidentअपघातSatara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान