शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

गुजरातमधील विद्यार्थ्यांची पाचगणीत फसवणूक

By admin | Published: January 03, 2016 10:02 PM

दांडेघर टोलनाका : १३० विद्यार्थ्यांकडून आकारले २ ऐवजी २० रुपये

महाबळेश्वर : पाचगणी येथील दांडेघर टोलनाक्यावर पर्यटकांची राजरोसपणे लूट केली जात आहे. जिल्ह्यातील कोणताही जबाबदार अधिकारी या लुटीची दखल घेत नसल्याने टोलनाक्याच्या ठेकेदाराची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी गुजरात राज्यातील सहा सहलींच्या बसेसमधील १३० विद्यार्थ्यांकडून २ रुपयांऐवजी २० रुपये असे एकूण ३ हजार रुपये वसूल केले; परंतु शिवसैनिकांनी ठेकेदाराचा मनसुबा उधळून लावला व तीन हजार रुपये ठेकेदारास परत करण्यास भाग पाडले. गुजरात राज्यातील म्हैसाणा येथील शैक्षणिक सहलीच्या सहा बसेस महाबळेश्वर येथे सहलीसाठी पाचगणी येथून येत होत्या. या सर्व बसेस दांडेघर येथे टोलसाठी थांबविण्यात आल्या, हे सर्व विद्यार्थी महाबळेश्वरला निघाले होते. त्यामुळे पाचगणी येथे प्रवासी कर देण्याची आवश्यकता नव्हती. याठिकाणी केवळ बसेसचा बायपासचा कर देणे आवश्यक होते. जरी हे विद्यार्थी पाचगणी फिरणार असले तरी त्यांना केवळ २ रुपये कर आहे; परंतु खासगी ठेकेदाराने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून २ रुपयांऐवजी सरळ २० रुपयांप्रमाणे टोल वसूल केला. १३० विद्यार्थ्यांचे २,६०० व सहा बसेसचे ७० रुपयांप्रमाणे ४२० असे एकूण ३,०२० रुपये ठेकेदाराने घेतले. परराज्यातील ही मंडळी असल्याने कर किती आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नाही. मागतील तेवढा कर भरून ही सर्व मंडळी महाबळेश्वर येथील टोलनाक्यावर आली. महाबळेश्वर येथील टोलनाक्यावर जेव्हा त्यांच्याकडे टोलची मागणी केली, तेव्हा त्यांनी पाचगणी येथे टोल भरल्याचा पावत्या दाखविल्या. याच ठिकाणाहून शिवसेनेचे विभाग प्रमुख शंकर ढेबे हे निघाले होते. त्यांनी गर्दी पाहून चौकशी केली असता, हा लुटीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.त्यांनी काही शिक्षक व बसचालकांना घेऊन पाचगणी येथील दांडेघर टोलनाक्यावर आले. याठिकाणी गोंधळ पाहून टोलनाक्यावर गर्दी झाली काहींनी या संदर्भात पाचगणी पोलिसांना कळविले. पाचगणी येथील शिवसेनेचे शहर प्रमुख संजय कासुर्डे, माजी तालुका प्रमुख अजित कासुर्डे हे शिवसैनिकांसह तेथे धावून आले. व एकच गोंधळ सुरू झाला. आपली चोरी पकडली गेली या कल्पनेनेच ठेकेदाराचा पारा चढला होता. अखेर ठेकेदाराने रुद्रावतापुढे बेकायदेशीर वसूल केलेले ३,०२० ही रक्कम सहलीच्या शिक्षकांना परत केली. (प्रतिनिधी)पालिका कर्मचाऱ्याला दमदाटी; फलकही फाडलामहाबळेश्वरच्या नावावर दांडेघर नाक्यावर बेकायदेशीर टोल वसूल करून पर्यटकांची फसणूक केली जाते. अशा तक्रारीची दखल घेऊन महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी आपला एक कर्मचारी तेथे पाहणी करण्यासाठी पाठविला असतात त्या कर्मचाऱ्यास दमदाटी देऊन हाकलून लावण्यात आले. फलक लावला तर तोही फाडून टाकण्यात आला.