आॅनलाईन लोकमतवाई , दि. ३0 : सातारा जिल्ह्यातील धोम धरणाच्या उभारणीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यानंतर प्रथमच धोम पाटबंधारे खात्याने कालवे सफाई मोहीम हाती घेतली आहे. धोम धरणापासून पाचवडपर्यंत दहा ते आकरा किलोमीटर अंतर कालव्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडे-झुडपे काढून साफसफाईची मोहीम हाती घेतली. वाई तालुक्यात डावा आणि उजवा असे धरणाच्या दोन्ही बाजूने कालवे काढण्यात आले. या कालव्याव्दारे हजारो शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनी ओलिताखाली आल्या. पाटबंधारे विभाग दोन्ही बाजूने सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून कर रुपाने पैसा गोळा करत आहे. तरीही गेल्या कित्येक वर्षात संबंधित खात्याने कालव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. पाटबंधारे प्रशासनाला कालवे दुरुस्तीला मुहूर्त मिळाला नाही. वाई तालुक्यात कित्येक वेळा कालव्याला भगदाड पडून कालव्याच्या शेजारच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरीही या खात्याला कधीही जाग आली नाही. तात्पुरती डागडुजी करून कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे काम चालू आहे. पाटबंधारे खात्याने कालव्याच्या डागडूजीच्या कामाला सुरुवात केली. किमान पाण्याचा जास्तीत-जास्त पाणी शेतीसाठी वापरता येईल पाण्याची नासाडी कमी होण्यासाठी सहकार्य मिळेल. अनेकवेळा झाडा-झुडपांच्या मुळ्या कालव्याच्या भगदाडाला कारणीभूत ठरतात, दोन्ही बाजूची साफसफाई केल्याने कालव्याला भगदाड पडण्यावर अंकुश मिळेल. तसेच कालव्यावर असणाऱ्या झुडपांमुळे श्वापदांचा त्रासही सहन करावा लागत होता. साहजिकच शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन कालव्यावरून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे ही साफसफाई फायदेशीर ठरणार आहे. पाटबंधारे खात्याने जसे साफसफाई चे काम हाती घेतले आहे त्याच प्रमाणे कालवे दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त शोधावा अशीही मागणी होत आह.
पन्नास वर्षांनंतर कालवे सफाई मोहीम युद्धपातळीवर
By admin | Published: June 30, 2017 1:16 PM