सातारा : ‘मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनपातळीवर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी होत आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाची भविष्यातील वाटचालही अशीच एकजुटीची राहील, पत्रकारांच्या निवृत्तीवेतनासाठी एकत्रित लढा उभारला जाईल,’ अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी दिली.
सातारा जिल्हा माहिती कार्यालयात शनिवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, दीपक शिंदे, दीपक दीक्षित, चंद्रसेन जाधव, तुषार तपासे, आदेश खताळ, महेंद्र खंदारे, विशाल गुजर, साई सावंत, जगदीश कोष्टी, दत्ता यादव, प्रशांत जाधव, सागर गुजर, संतोष नलावडे, प्रकाश शिंदे, अमित वाघमारे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
विनोद कुलकर्णी म्हणाले, हरीश पाटणे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पत्रकार संघ अभेद्य व एकजूट आहे. एका झेंड्याखाली सातारा जिल्ह्यातील पत्रकार एकत्र आहेत. भविष्यातही असेच एकत्र राहू. दीपक दीक्षित म्हणाले, सातारा जिल्हा पत्रकार संघाने बाळशास्त्री जांभेकरांची शासकीय जयंती साजरी करून चांगला पायंडा पाडला. हरीश पाटणे यांनी सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकारांना धन्यवाद दिले.
सातारा येथे खा. शरद पवार यांच्या पावसातील ‘त्या’ सभेचे साताऱ्यातील पत्रकारांनी मोठे कव्हरेज दिले. त्यामुळेच राज्यात सत्ताबदल झाला. असे असताना एका मुलाखतीत खा. सुप्रिया सुळे यांनी या सभेला कोणीही पत्रकार उपस्थित नव्हते, असे म्हणत साताऱ्यातील पत्रकारांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य मागे घेत माफी मागावी, अन्यथा सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करू, असा इशारा सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.
‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रतिमेस नायब तहसीलदार (महसूल) राजेश जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार (गृह शाखा ) महेश उबारे व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
चौकट..
सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा निषेध
सातारा येथे लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा प्रचारासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीची शेवटची प्रचार सभा झाली होती. ही सभा केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने एका कॅमेऱ्याच्या साहाय्याने कव्हर केली. यावेळी कोणीही पत्रकार उपस्थित नव्हते, असे वक्तव्य खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा साताऱ्यातील पत्रकारांनी समाचार घेतला.
फोटो ओळ : सातारा येथे जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त पत्रकारांतर्फे अभिवादन करण्यात आले.
फोटो नेम : २०सॅट४५
Attachments area