पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. निवडणूक निकालानंतर दोन गटात वाद झाला. वाद वाढत गेल्यावर त्यांच्यात मारामारी झाली. अभिजीत प्रताप थोरात (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, जगन्नाथ प्रल्हाद थोरात, प्रताप आकाराम थोरात, प्रसाद प्रताप थोरात, विनायक शिवाजी थोरात, सुहास संभाजी थोरात, सुदाम रघुनाथ थोरात, सुजय संजय थोरात, प्रतिक प्रताप थोरात, संभाजी विलास थोरात (सर्व रा. कालवडे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी दुपारी अभिजीत थोरात हे गाडीतून गावातून निघाले होते. तेव्हा विरोधी पॅनलच्या पराभूत उमेदवाराने जमाव केला. जगन्नाथ थोरात यांनी रस्त्यावरील दगड अभिजीत थोरात यांना मारला. त्यामध्ये ते जखमी झाले. तर प्रताप थोरात याने काठीने मारहाण केली. इतरांनी अभिजीत व त्याच्या मित्रास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याउलट जगन्नाथ प्रल्हाद थोरात (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मनोहर मारूती थोरात, अभिजीत प्रताप थोरात, अमोल प्रताप थोरात, मनोहर भगवान थोरात, प्रकाश आत्माराम थोरात, हरीष शिवाजी थोरात, शुभम धनाजी थोरात, विजय मारूती थोरात, जयदीप रामदास टोमके (सर्व रा. कालवडे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, जगन्नाथ थोरात हे गावात उभे असताना विजयी उमेदवाराने जमाव करून मनोहर थोरात, अभिजीत थोरात, अमोल थोरात यांच्यासह इतरांनी जगन्नाथ थोरात यांना मारहाण केली. सुहास थोरात, राजेंद्र थोरात यांनाही मारहाण केली. मनोहर थोरात याने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी गर्दी असताना बेदरकार चालवली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
या मारामारीमुळे कालवडेत तणाव असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करत आहेत.