..........
सातारा शहरातील व्यापारी पेठेमध्ये शनिवार व रविवारी संचारबंदीच्या काळात दुकाने बंद ठेवली जात असली तरी दुसऱ्या दाराने लोकांना सेवा दिली जात आहे. संचारबंदीच्या नियमानुसार विनाकारण कोणीही रस्त्यावर यायला नको. तरीदेखील लोक रस्त्यावर येतातच कसे? हा प्रश्न निर्माण हाेतो. नागरिक वस्तूंची मागणी करत असल्याने दुकानदारदेखील मागील दाराने त्यांना वस्तू देत आहेत.
.......................
शहरात निर्बंध उठल्यानंतर सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत होऊ लागले आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने येऊ लागली आहेत. पार्किंगमध्ये चुकीच्या पध्दतीने वाहने लावली जात असल्याने व्यावसायिकांना तसेच ग्राहकांनादेखील त्याचा त्रास होतो आहे. वाहतूक शाखेने आता चुकीच्या पध्दतीने लावलेली वाहने उचलून नेण्याचे सत्र सुरु केलेले आहे. ही कारवाई सतत सुरू राहिली तरच वाहनधारकांना शिस्त लागेल.