..............................
लसीकरणासाठी कोविड चाचणी केली जाते, या चाचणीतून कोरोनाबाधित येऊ या भीतीने अनेक जण अजूनही लसीकरणासाठी जात नाहीत. मात्र लसीकरणासाठी कोविड चाचणी बंधनकारक नसून १८ वर्षांवरील प्रत्येकाचे लसीकरण केले जात आहे. तसेच लसीकरणासाठी कोविड चाचणी करण्याबाबत आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिली.
....................
जिल्ह्यात शहरी भागामध्ये लसीकरणासाठी मोठी गर्दी होते. मात्र ग्रामीण भागात लोक लसीकरणासाठी उत्सुक नसल्याचे चित्र आहे. तसेच कोरोना चाचणी करण्याबाबतही टाळाटाळ केली जात आहे. हेच लोक सुपरस्प्रेडर ठरत असून ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. प्रशासनाला याबाबत काम करावे लागणार आहे, अन्यथा कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होणार नाही.