सातारा येथील जम्बो कोविड सेंटरच्या बाहेर होत असलेली गर्दी काही केल्या कमी व्हायला मार्ग नाही. अनेकजण विनाकारण जम्बो कोविड सेंटरच्या परिसरामध्ये थांबलेले असतात. अनेकांचा हेतू वेगळा असतो. काहीजण एजंटगिरी देखील करत आहेत. पैसा कमावण्याचे साधन म्हणूनदेखील लोक कोविड सेंटरच्या आजूबाजूला उभे राहिलेले असतात. याबाबत लोकांच्या तक्रारी आहेत.
शहरातील व्यापारी पेठांमध्ये व्यावसायिक शटर उघडून लोकांना साहित्य देत आहेत. हे साहित्य घ्यायला लोक रस्त्यावर उतरतात. यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊन असताना लोक रस्त्यावर उतरताच कसे ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे. शासनाच्या नियमांचे घरात बसून पालन करणाऱ्या लोकांनी फक्त नियम पाळायचे का? इतरांचे ते काम नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.