शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

‘प्लेट’वरचे आकडे गूल; ‘नंबर’ कहाँ है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:12 AM

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : प्रत्येक वाहनाला ‘आरटीओ’चा नोंदणी क्रमांक असतोच; पण सध्या विनानंबरची शेकडो वाहने रस्त्यावरून धावतायत. संबंधित वाहनांवर ‘प्लेट’ लटकलेली असते. त्यावर पुसटसा नंबरही दिसत असतो. मात्र, तो नंबर नेमका किती, हे कोणीच सांगू शकत नाही. गाडी चकाचक ठेवण्यावर वाहनधारक जेवढा भर देतात तेवढे ते नंबरबाबत गंभीर ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : प्रत्येक वाहनाला ‘आरटीओ’चा नोंदणी क्रमांक असतोच; पण सध्या विनानंबरची शेकडो वाहने रस्त्यावरून धावतायत. संबंधित वाहनांवर ‘प्लेट’ लटकलेली असते. त्यावर पुसटसा नंबरही दिसत असतो. मात्र, तो नंबर नेमका किती, हे कोणीच सांगू शकत नाही. गाडी चकाचक ठेवण्यावर वाहनधारक जेवढा भर देतात तेवढे ते नंबरबाबत गंभीर नसल्याचेच यावरून दिसून येते.कºहाड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने गत काही दिवसांपासून खराब नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत तीनच दिवसांत तब्बल अडीचशे वाहनांवर कारवाई झाली. गत वर्षभराचा विचार करता अशा प्रकारची कारवाई झालेल्या वाहनांची संख्या अडीच हजारांपेक्षाही जास्त आहे. त्यावरून वाहनधारक नंबरप्लेटबाबत जागरूक नसल्याचे दिसून येते. खराब नंबर प्लेटबरोबरच फॅन्सी प्लेटवरही पोलिसांचा वॉच आहे. फॅन्सी प्लेट असलेल्या वाहनांवरही पोलीस कारवाई करीत असून, गत वर्षभरात अशा शेकडो वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.नंबरप्लेटबाबत अनेक नियम आहेत़ रिक्षा, प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीच्या वाहनांसाठी पिवळ्या रंगावर काळ्या रंगात क्रमांक लिहिलेला असावा, असा नियम आहे़ दुचाकी वाहनांसाठी पांढऱ्या रंगावर काळ्या रंगात अक्षरे लिहिणे बंधनकारक आहे़ वाहनाच्या पुढील व मागील नंबरप्लेटची उंची, आकार, रंग केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार निश्चित करून देण्यात आला आहे़ दुचाकी वाहनांसाठी १५ एमएम व चारचाकी वाहनांसाठी २५ एमएम आकाराची नंबरप्लेट सक्तीची आहे़ अंक, त्याची उंची, रुंदी व दोन आकड्यांमधील अंतरसुद्धा ठरवून देण्यात आले आहे; पण जे वाहनधारक नंबरबाबतच गंभीर नाहीत ते प्लेटच्या नियमाबाबत किती जागरुक असतील, याचा विचार न केलेलाच बरा.शहरातील रस्त्यावरून सध्या नंबरप्लेट खराब असणारी शेकडो वाहने धावताना दिसतात. काही वाहनांच्या प्लेटवरील नंबरचा रंग उडालेला असतो. तर काही वाहनांची प्लेट निम्म्यातून मोडलेली असते. काहीजण तर विनानंबरची वाहने बिनदिक्कतपणे दामटताना दिसतात. अशा वाहनधारकास वाहतूक पोलिसांनी अडवले तर त्वरित नंबर टाकून घेण्याचे तो मान्य करतो. मात्र, त्यानंतरही अनेकजण नंबर टाकून घेण्याची तसदी घेत नाहीत.प्लेट शंभरची; दंड भरतात दोनशेकोणत्याही वाहनासोबत नंबरप्लेट मिळतेच. त्या प्लेटवर फक्त नंबर टाकण्याचा खर्च वाहनधारकाला करावा लागतो. हा खर्चही शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत असतो. रेडीअममध्ये नंबर टाकायचा झाल्यास तो खर्च थोडाफार वाढतो. मात्र, अनेक वाहनधारक नंबरसाठीचा हा खर्च टाळतात. ज्यामुळे त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. पोलीस खराब नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकास दोनशे रुपये दंड करतात. असाच दंड दोन ते तीनवेळा भरावा लागल्यास वाहनधारकाला नाहक चारशे ते सहाशे रुपयांचा फटका बसतो.‘फॅन्सी‘ प्लेटची वाढती ‘क्रेझ’दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनधारकांमधील ‘फॅन्सी’ नंबप्लेटची ‘के्रझ’ सध्या भलतीच वाढली आहे. रस्त्यावर धावणाºया वाहनांपैकी अनेक वाहनांच्या नंबरप्लेटवर आकड्यांच्या माध्यमातून शब्द तयार करण्यात आल्याचे दिसून येते़ हे शब्द तयार करतानाही दादा, मामा, भाऊ, तात्या, आबा, बाबा अशी पडनावं किंवा पाटील, पवार अशी आडनावं साकारली जातात़ अशी नंबर प्लेट असलेल्या वाहनाला हजार रुपये दंड केला जातो.चार दिवसांत दीड लाख वसूलकºहाड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने गत चार दिवस शहरात कारवाईची विशेष मोहीम राबविली. कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप चौक, भेदा चौक, दत्त चौक, कर्मवीर चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका यासह अन्य ठिकाणी पोलिसांनी साडेसहाशे वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये अवैध प्रवासी वाहने १०, खराब नंबरप्लेटच्या २६३, ट्रीपल सीट ४ यासह इतर ३३४ वाहनांवर कारवाई करून १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.