शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

शाळेच्या निकृष्ट बांधकामाची दाखविली चित्रफीत

By admin | Published: December 24, 2014 11:26 PM

पाटण पंचायत समिती सभा : अभियंता बनले ठेकेदार; राजेश पवार यांचा आरोप

पाटण : ‘तालुक्यातील पाळशी, पळासरी, उधवणे, धोंडेवाडी या प्राथमिक शाळांच्या इमारत बांधकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, बांधकामे दोन वर्षांपासून अपूर्ण आहेत. बांधकाम न करताच मुख्याध्यापकांनी बँक खात्यावरील पैसे काढले तर बांधकामाचे मूल्यमापन करणारे इंजिनिअर्सच ठेकेदार बनले आहेत. त्यामुळे उत्कृष्ट बांधकामाच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या,’ असा आरोप सदस्य राजेश पवार यांनी केला.पाळशी येथील शाळा इमारत बांधकामाची दुर्दशा दाखविणारी मोबाईल चित्रफीत उपसभापती डी. आर. पाटील यांनी दाखविली. त्यामुळे पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित सदस्य व अधिकारी आवाक् झाले.सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. शाळा इमारत बांधकामावर बोलताना राजेश पवार म्हणाले, ‘इंजिनिअर्स स्वत:च्या भावाच्या मुलाच्या किंवा नातेवाइकांच्या नावावर ठेकेदारी करत असून, निकृष्ट बांधकामामुळे शाळा इमारतींचा विद्यार्थ्यांना धोका संभवतो.’ ‘खोट्या पद्धतीने पटपडताळणी करून शिक्षक नेमणाऱ्यांवर कारवाई करा,’ अशी मागणी रामभाऊ लाहोटी यांनी केली. ‘पाईका’ योजनेअंतर्गत शाळेच्या मैदानासाठी लाखो रुपये अनुदान आले आहे. ते ग्रामपंचायत खात्यावर पडून आहे. त्याबाबत कार्यवाही व्हावी, ’असे विजय पवार म्हणाले. ‘अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वाढीव आलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, अशी मागणी लाहोटी यांनी केली. काठी-अवसरी येथे चार दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे,’ असे शोभा कदम म्हणाल्या. ‘पाटण तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण जास्त असून, दर हजारी पुरुषांमागे १,०४८ स्त्रिया इतके आहे,’ असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांनी सांगितले. तर मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कामचुकारपणा करतात,’ असे सदस्य नथुराम कुंभार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रविवारी ९६ गावांची बैठक‘कस्तुरी रंगन समितीने पाटण तालुक्यातील ९६ गावे इको सेन्सेटिव्ह म्हणून जाहीर केली आहेत. त्या ग्रामपंचायतींच्या हरकती मागविल्या आहेत. तेव्हा पुढील दिशा ठरविण्यासाठी अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पबाधित गावांची तसेच ९६ गावांची महत्त्वाची बैठक रविवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कोयनानगर येथे आहे,’ अशी माहिती मानवी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती राजाभाऊ शेलार यांनी सभागृहात दिली.डॉक्टरांची अरेरावी...तारळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर हे अरेरावीपणा करत असून, उपसभापती व पंचायत समिती सदस्यांसमोर दादागिरीची भाषा, नर्सबरोबर बाचाबाची करतात. त्यांचे मोबाईल संभाषण ऐकवत उपसभापती डी. आर. पाटील यांनी कडक कारवाईची मागणी केली.