आॅनलाईन लोकमतफलटण , दि. १९ : देवाला कोठेही शोधू नका, सदाचारी चांगल्या माणसाचा शोध घ्या, त्यातच तुम्हाला देव भेटेल. फलटण तीर्थ क्षेत्रावर माणसाला माणूस बनविण्याचा कारखाना ज्ञानगंगा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू होत असून, त्या ठिकाण फक्त माणुसकीवर भाष्य केले जाणार आहे. सर्व धर्मांतील लोकांनी २४ तासातला एक तास मला द्यावा, मी उरलेले २३ तास बदलवून दाखवेल, असा ठाम विश्वास भारत गौरव, राष्ट्रसंत मुनिश्री पुलकसागरजी गुरुदेव यांनी व्यक्त केला.दरम्यान, दि. २२ जूनपर्र्यत रोज सकाळी साडे वाजता सकल जैन समाज गोशाला एवं अहिंसा वन (सातारा पूलजवळ, फलटण) ज्ञानगंगा महोत्सव मंगल प्रवचन आयोजित केले आहे. यानिमित्त ते बोलत होते. यावेळी फलटण नगरपालिकेचे नगरसेवक अनुप शहा, श्रीपाल जैन उपस्थित होते.ज्ञानगंगा महोत्सव मंगल प्रवचनात राष्ट्रहित, सामाजिक, पारिवारिक, समस्यांवर भाष्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी असून, इथे मोठमोठ्या संतांचे जन्म झाले. धार्मिक भूमीत प्रवचन करण्याचा योग आल्याचे समाधान व्यक्त करीत आज मनुष्याकडे संपत्ती, भौतिकसाधन सुविधा मोठ्या प्रमाणात आहे. पण मानसिक समाधान नाही. यासाठी मानवाच्या मनावर चांगल्या विचारांचे परिणाम होण्यासाठी प्रबोधन आणि प्रवचनाची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर एखाद्याला लाखो मित्र बनविता येतात; मात्र त्याला शेजारी कोण राहतो हे माहीत नसते. समाजा-समाजात धर्मांधता वाढत आहे. माणुसकीची हत्या होत आहे. संस्कृती लोप पावत चालली आहे. हे सर्व दुरुस्त करण्यासाठी मानवाला मानव बनविण्याची आवश्यकता आहे. ज्ञानगंगा महोत्सव प्रवचनात मानवतेविषयी चर्चा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.धर्म आणि राजनीती या दोन भिन्न बाबी असून, दोन्ही महत्त्वाच्या आहेत. धमार्ने राजनीतीला मार्गदर्शन करावे; परंतु धमार्ने राजनीतीत विलिन होऊ नये राजनीतीमध्ये धर्म नसावा देशाला धोका बेईमानापासून आहे. कोणत्याही धमापार्सून नाही. धर्मांध व्यक्तीमुळेच धर्मच गोंधळात पडला जात आहे.माणूस उच्चशिक्षित झाला प्रचंड ज्ञान मिळविले. ज्ञानाच्या माध्यमातून संपत्ती मिळवली आणि भौतिक गोष्टी मिळविल्या तरीही त्याचे समाधान झाले नाही. कारण मानवाचे मन एका संकुचित चौकटीत अडकून पडले आहे. ज्ञान आणि संपत्ती प्रंचड झाली; परंतु मन मात्र छोटेसे राहिले, असल्याचे खंत पुलकसागरजी महाराज यांनी व्यक्त केले.सकल जैन समाज गोशाळेच्या आवारात उभारलेल्या सूशोभित मंडपात पाच दिवस चालणारा ज्ञानगंगा महोत्सव हा सर्व धर्मियांसाठी खुला आहे. या प्रबोधनात्मक कार्यक्रमास शहर परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन समाज गोशाळेचे प्रमुख अनुप शहा यांनी केले आहे.
सदाचारी माणसाचा शोध घ्या.. देव भेटेल : मुनिश्री पुलकसागरजी
By admin | Published: June 19, 2017 4:49 PM