सातारा,11 : दिवाळी सणाला काही दिवस बाकी राहिलेले असतानाच न्यायालयाने दिवाळीत फटाके विक्रीस मनाई केल्यामुळे साताºयातील फटाके विक्रेते चिंताग्रस्त झाले आहेत.
दिवाळीच्या तोंडावर दरवर्षी फटाके विक्रेते फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवत असतात. यंदाही फटाक्यांचा साठा करण्यात आला आहे. असे असताना फटाके विक्रीस मनाई केल्याने विक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. अनेकजण फटाक्यांचा व्यवसाय हंगामी करत असतात.
अशा व्यावसायिकांनी बँकेतून कर्ज काढून फटाक्यांचा साठा केला आहे. पाच ते दहा लाखांपर्यंत फटाक्यांची खरेदी करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेला साठा वाया जाणार असल्याने विक्रेते अस्वस्थ झाले आहेत.
सातारा फटाका असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.