शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

बहिणींसमोरच पवनवर गोळीबार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:45 PM

कºहाड : रस्त्यावरील गोंधळ ऐकून टीव्ही पाहत असलेला पवन घराबाहेर आला. मात्र, त्याला पाहताच हल्लेखोरांनी पिस्तूल रोखले. अंदाधुंद गोळीबार ...

कºहाड : रस्त्यावरील गोंधळ ऐकून टीव्ही पाहत असलेला पवन घराबाहेर आला. मात्र, त्याला पाहताच हल्लेखोरांनी पिस्तूल रोखले. अंदाधुंद गोळीबार करीतच ते त्याच्या दिशेने धावले. या गोळीबारात तब्बल अकरा गोळ्या पवनला लागल्या आणि क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. हा सगळा प्रकार त्याच्या दोन बहिणींसमोरच झाला. भावाची अवस्था, प्रचंड गोळीबार आणि उडालेल्या गोंधळामुळे त्या दोघीही मुर्छित झाल्या.कºहाडातील महात्मा फुले नगरमध्ये येताच संशयित शिवराज इंगवले याने त्याच्या हातातील रिव्हॉल्व्हरने हवेत गोळी झाडली. तसेच पवनचे नाव घेऊन सर्व संशयित मोठ-मोठ्याने ओरडत होते. हा गोंधळ ऐकून घरात टीव्ही पाहत बसलेला पवन घराबाहेर आला. त्याला पाहताच संशयित जुनेद शेख, समीर मुजावर, मजहर मुजावर, शिवराज इंगवले, हैदर मुल्ला त्याच्या दिशेने धावले. त्यावेळी पवनने नजीकच असलेल्या तांबोळी पोहा मिलच्या पायरीवरून उडी मारून तेथून पळून जाण्याचा प्रयत्नकेला. मात्र, संशयितांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला.पवन घरातून बाहेर धावल्याने त्याच्या पाठोपाठ त्याच्या दोन्ही बहिणी पूजा व काजलही बाहेर धावत आल्या. काय घडतंय, हे समजण्यापूर्वीच त्यांच्या डोळ्यासमोरच संशयितांनी पवनवर गोळ्या झाडल्या. त्यापैकी अनेक गोळ्या पवनला लागल्या आणि तो खाली कोसळला. पूजा व काजल मोठ्याने ओरडल्या. मात्र, त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करीत संशयितांनी गोळीबार करून कार व दुचाकीवरून तेथून पळ काढला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पवनला पाहिल्यानंतर पूजा व काजल बेशुद्ध झाल्या. तसेच गोळीबार सुरू असताना चौकात उभे असलेले उदय सातपुते आणि महेश दुबळे हेही घाबरले. गोळीबार सुरू असताना ते तेथून काही अंतरावर गेले. तसेच संशयित निघून गेल्यानंतर ते पवनकडे धावले. त्यांनी त्याला त्वरित कृष्णा भोसले यांच्या रिक्षातून सह्याद्री रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत पवनचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटना समजल्यानंतर शहरातील दुकाने बंद ठेवलीसंशयिताच्या घरावर दगडफेकमृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर संतप्त जमाव मंगळवार पेठमार्गे बुधवार पेठेकडे जात होता. यावेळी कडक पोलीस बंदोबस्तही तैनात होता. मात्र, तरीही संतप्त जमावाने एका संशयिताच्या घरावर दगडफेक करून घराच्या काचा फोडल्या. तसेच मंगळवार पेठ परिसरातील काही दुकाने व वाहनांवरही यावेळी दगडफेक करण्यात आली.दुचाकी, रिक्षा पेटवली...पवनचा मृत्यू झाल्याची माहिती शहरात पसरल्यानंतर पहाटेच्या सुमारास शेकडो युवक बुधवार पेठेत जमा झाले. त्याठिकाणी जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच काही युवक प्रभात थिएटरपासून चालत बापूजी साळुंखे पुतळ्यानजीक गेले. चर्चसमोर उभी असलेली दुचाकी व एक रिक्षा युवकांनी जाळली.