विसर्जनाचा अर्थ असा सांगितला की, हे जग एका चक्राच्या रूपात चालते. जो आला आहे त्याला जावेच लागणार आणि पुन्हा तो परतून येणार. गणपती विसर्जनाशी निगडित अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजेच गणपतीला जलतत्त्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचे मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केले जाते. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं.
गणेश मूर्तीचे विसर्जन कसे करावे, याबाबत धर्मशास्त्रात काही दाखले मिळतात. त्यानुसार अनंत चतुर्दशीदिवशी मोदक, शिरा जे काही गोड पदार्थ उपलब्ध असेल असा गोडाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर त्याचे पूजन करून विसर्जनाच्या अक्षता बाप्पांच्या चरणावर अर्पण कराव्यात. त्यानंतर मूर्ती उत्तरेकडे हलवायची. यामुळे मूर्तीचे विसर्जन झाले असे मानले जाते.
गणेश मूर्तीचे विसर्जन कोठे करावे, याबाबत अनेक मतप्रवाह येत असले तरी अमुक पाण्यातच विसर्जन करावे, असे नाही. शक्यतो वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. मात्र, ज्या भागात नदी नाही. ओढ्याला पाणी नाही, अशा ठिकाणी गणेश मूर्ती ही शेततळं, विहिरीत विसर्जित केली तरी चालते.
- जगदीश कोष्टी
चौकट
निर्माल्य झाडांना घालावे
गणेशोत्सव काळात दररोज दोन वेळा पूजा केल्यानंतर तयार होणारे निर्माल्य शेत, झाडांना किंवा बागेत घालावे. यामुळे माणसांना त्रास न होता निसर्गाला फायदा होईल, याची काळजी घ्यावी.
कोट
विसर्जन हे पार्थिव म्हणजे मातीच्या मूर्तीचे केले जाते. यांतू देवगणा सर्वे पूजामादाय पार्थविम्ब, इष्ट कामना प्रसिध्यर्थम पुनर्रआगमानायच हा मंत्र म्हणून विसर्जन करावी. धातूच्या मूर्ती असल्यास विसर्जनाच्या अक्षता पायावर अर्पण करून मूर्ती उत्तरेकडे हलविली तरी विसर्जन झाले, असे मानले जाते.
- महेश जंगम, सातारा.