शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘हर हर महादेव’च्या गजरात पहिला टिकाव

By admin | Published: April 10, 2017 3:55 AM

माण तालुक्यात शनिवारी वॉटर कप स्पर्धा-२ सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १५ हजारांचा

दहिवडी (जि.सातारा) : माण तालुक्यात शनिवारी वॉटर कप स्पर्धा-२ सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १५ हजारांचा आकडा पार करीत लोकांनी उत्साहात श्रमदान केले. राजवडी ग्रामस्थांनी पहिला टिकाव ‘हर हर महादेव’च्या गजरात मध्यरात्री १२ वाजता मारला आणि कामाला सुरुवात केली. अभिनेता आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’मार्फत ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माण तालुक्यातील एकूण ३२ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. शनिवारी पहिलाच दिवस होता. पुरुष, महिला सकाळी लवकर घरचे काम आटोपून कामाच्या ठिकाणी पोहोचले. शंगणापूरच्या शंभो महादेवाला वंदन करून मध्यरात्रीच्या १२ वाजता राजवडीमधील युवकांनी श्रमदानाला सुरुवात केली. मार्डी येथे फलटणवरून लोकांनी येऊन श्रमदान केले. तर पिंगळीमध्ये अभिषेक करून श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी ‘तुफान आलंया’ या गाण्याच्या आवाजात श्रमदान केले गेले. माण तालुक्यात यात्रांचा हंगाम असूनही या ३२ गावांत पहिल्याच दिवशी १५ हजारांच्या वर लोकांनी श्रमदान केले. अनेक ठिकाणी लुज बोल्डर कामे करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येकी ८ या प्रमाणे प्रांताधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी ३२ गावे दत्तक घेतली आहेत. (प्रतिनिधी)