मांढरदेव : वाई तालुक्यातील मांढरदेव परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. रविवारपासून मांढरदेव डोंगर पठारावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी भोर-मांढरदेव या घाटरस्त्यावर दरड कोसळली. या दरडीमुळे भोर-मांढरदेव घाटात वाहतूक ठप्प झाली होती. दरडीतील काही दगडी हटवून लहान वाहनांची वाहतूक पूर्वरत झाली आहे. मात्र, एस.टी. ट्रक अशा मोठ्या वाहनांची वाहतूक दुपारपर्यंत बंदच होती. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भोर-मांढरदेव व मांढरदेव-वाई या घाट रस्त्यांमध्ये जागोजागी छोटे-मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. रस्त्यावर दगडांबरोबर माती वाहून आल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मांढरदेवला दरवर्षीच चांगला पाऊस होत असतो. त्यामुळे या मार्गावरील घाटात साईडपट्ट्या भरून घेऊन कठडे बांधण्याची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणीही होत आहे. (वार्ताहर) मांढरदेवला पावसाचा जोर मांढरदेव : मांढरदेव आणि परिसरातील गावांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासूनच पावसाची संततधार परिसरात चालू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. वाई-मांढरदेव व मांढरदेव-भोर घाटरस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड, माती, पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे काळुबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे. पावसामुळे शेतकरी वर्ग व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दगड, मुरूम रस्त्यावर... काळुबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या भोरमार्गे जास्त आहे. भोर-मांढरदेव या घाटरस्त्यात जागोजागी छोट्या दरडी कोसळल्या आहेत. एका ठिकाणी मोठी दरड कोसळल्याने मोठे दगड, मुरूम, माती, झाडे रस्त्यावर आली आहेत. दरड कोसळल्यानंतर छोटे दगड बाजूला करून दुचाकी, रिक्षा, जीप, कार, टेम्पो यांची वाहतूक चालू आहे. मात्र, अजूनही अवजड वाहनांची वाहतूक सुरू नाही.
पहिल्याच पावसात दरड कोसळली
By admin | Published: June 22, 2015 11:19 PM