शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

साताऱ्यात पहिले शिव साहित्य संमेलन, शिवजयंतीदिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:37 IST

सातारा : शिवजयंती महोत्सव समिती सातारा यांच्या वतीने दि. १७ ते १९ फेब्रुवारीअखेर शाहू कलामंदिर येथे पहिल्या शिव साहित्य ...

सातारा : शिवजयंती महोत्सव समिती सातारा यांच्या वतीने दि. १७ ते १९ फेब्रुवारीअखेर शाहू कलामंदिर येथे पहिल्या शिव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ रोजी सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.या कार्यक्रमाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, आयसीसीआर नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांची उपस्थिती आहे. दि. १७ रोजी सकाळी सौरभ कर्डे, शैलेश वरखडे, पियुषा भोसले यांचा पाेवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यानंतर ‘छत्रपती युद्धनीती’ या विषयावर मोहन शेटे, छत्रपतींची दुर्गनीती या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर यांचे मार्गदर्शन सत्र होणार आहे. तसेच अफजलखान वध प्रसंग सारंग मांडके, सारंग भोईरकर सादर करणार आहे. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

उंट-घोडे, केरळी वाद्यांचा सहभागदि. १८ रोजी सायंकाळी गड पूजन व किल्ले अजिंक्यतारा येथे मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तर दि. १९ रोजी शिवजयंतीच्या मुख्य दिवशी सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. केरळचे १०० कलाकार केरळी वाद्यांसह शोभायात्रेत सहभागी होत आहेत. शोभायात्रेत गजीनृत्य, ढोल-ताशा पथक, तुतारी, हलगी वादन तसेच अन्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत. उंट-घोडे शोभायात्रा मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivjayantiशिवजयंती