वडूज : भुरकवडी (ता. खटाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कोविड लसीकरणाचा दुसरा डोस देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. या लसीकरणाचा प्रारंभ सरपंच ललिता कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. युनूस शेख, डॉ. निखील लोंढे, डॉ. रणदिवे, माजी सरपंच शिवाजीराव कदम, ग्रामसेविका धनश्री गंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासन नियमानुसार खटाव तालुक्यातील प्रथमत: भुरकवडीमध्ये दुसरे लसीकरण पार पडले असून, यावेळी नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये १५० लसीकरण डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी १२३ लोकांना लसीकरण करण्यात आले. भुरकवडीमधील १०४, वडूज, सातेवाडी, वाकेश्वर व कुरोली येथील १९ लोकांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणावेळी ऑनलाईन पूर्तता करण्याकामी अनिकेत जाधव व निशांत नवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंत्रालयातील स्वीय सहाय्यक पदावर असलेले प्रवीण लावंड यांच्या सहकार्याने व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, आरोग्यसेविका स्मिता जंगम यांच्या मदतीने हे लसीकरण पार पडले.
यावेळी आरोग्यसेवक नीलेश राऊत, शिवाजी काळे, आशा स्वयंसेविका रेश्मा फडतरे, सीमा जाधव यांच्या मदतीने लसीकरण पार पडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कदम यांनी केले तर प्रवीण कदम यांनी आभार मानले.
१६ भुरकवडी
भुरकवडी येथे दुसऱ्या लसीकरण डोसचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच ललिता कदम व इतर मान्यवर उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)