शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

अरबी समुद्रात पाच किलोमीटर पोहण्याचा भांडे-पाटील कुटुंबाचा विक्रम : शिरवळचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 8:43 PM

शिरवळ : अरबी समुद्रातील संकरॉक लाईट हाऊस ते गेट वे आॅफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर एक तास एकवीस मिनिटांत पार करण्याचा विक्रम शिरवळच्या सूर्यकांत भांडे-पाटील यांच्या कुटुंबाने

ठळक मुद्देएक तास एकवीस मिनिटांत पार

शिरवळ : अरबी समुद्रातील संकरॉक लाईट हाऊस ते गेट वे आॅफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर एक तास एकवीस मिनिटांत पार करण्याचा विक्रम शिरवळच्या सूर्यकांत भांडे-पाटील यांच्या कुटुंबाने नोंदविला. या मोहिमेत सूर्यकांत भांडे-पाटील यांच्यासमवेत पत्नी प्रतिभा व मुलगा सौरभ यांनी सहभाग घेतला.जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असेल अन् त्याला कुटुंबाची साथ लाभली तर थैमान घालणाऱ्या समुद्राच्या बेभान लाटांनाही थोपविण्याची ताकद निर्माण होते. अशीच किमया शिरवळ येथील सूर्यकांत भांडे-पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाने करून दाखविली. बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत भांडे-पाटील त्यांची पत्नी प्रतिभा प्राथमिक शिक्षिका आहेत. पन्नास वर्षीय या जोडप्याने जलतरणपटू असलेला मुलगा सौरभला सोबत घेत अरबी समुद्र्रामध्ये एकाच वेळी एकाच वेगात पोहून विश्वविक्रम करण्याचा संकल्प केला. यासाठी भांडे-पाटील दाम्पत्य वेळ मिळेल तसा सराव करू लागले. शिक्षणासाठी बाहेर असलेल्या सौरभला सरावासाठी कमी वेळ मिळाला.भांडे-पाटील कुटुंबीयांनी मुंबई येथील संकरॉक लाईट हाऊस ते गेट-वे आॅफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर प्रशिक्षक सतीश कदम, बाळासाहेब घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य जलतरण संस्थेचे निरीक्षक निल दबडे, विनय शहा यांच्या निरीक्षणाखाली व मुंबई येथील संजय कोळी यांच्या पाच बोटींच्या सहकार्याने पार केले. ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’च्या गजरात व ‘जय भवानी, जय शिवाजीऽऽ’च्या जयघोषात संकरॉक लाईट हाऊस येथून अरबी समुद्र्रात थैमान घालत असलेल्या लाटांच्या तुफानाला सामोरे गेले. एकाच वेळी एकाच वेगाने भांडे-पाटील कुटुंबीय गेट वे आॅफ इंडियाच्या दिशेने मार्गस्थ झाले. हे अंतर दोन तासांमध्ये पूर्ण करण्याचा अंदाज बाळगत असताना दृढ निश्चयाच्या आधारावर अवघ्या एक तास एकवीस मिनिटांमध्ये पार करीत एक आगळावेगळा संपूर्ण कुटुंबाने समुद्र्राच्या लाटेवर स्वार होण्याचा संकल्प पूर्ण केला.यावेळी विश्वविक्रमी वेळेत पाच किलोमीटरचे अंतर पोहून पार केल्याबद्दल भांडे-पाटील कुटुंबीयांचा विविध संघटनांतर्फेगेटवे आॅफ इंडिया याठिकाणी सत्कार केला. मोहिमेसाठी संकेत भांडे पतसंस्था शिरवळ, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना, रणमर्द तानाजी तरुण मंडळ, भोंगवली, शिरवळ ग्रामस्थ, सद्गुरू शंकर महाराज क्रीडा प्रतिष्ठान, शिरवळ ग्रामस्थ, राजमुद्र्रा हौसिंग सोसायटी यांनी सहकार्य केले.कोटआमचा मुलगा सौरभ याच्यासमवेत अरबी समुद्र्रात विश्वविक्रम केल्यानंतर संपूर्ण कुटुंबानेच जागतिक पोहण्याचा आगळावेगळा संकल्प केला. याक्ररता नेहमीच प्रत्येक क्षणात माझा खांद्याला खांदा लावून लढा देणारी पत्नी प्रतिभा याची मोलाची साथ या संकल्पाला जिद्दीने मिळाली.- सूर्यकांत भांडे-पाटीलबांधकाम व्यावसायिक, शिरवळछायाचित्र -०४शिरवळमुंबई येथील संकरॉक लाईट हाऊस ते गेटवे आॅफ इंडिया अंतर पोहून जाण्याचा विक्रम केल्यानंतर सूर्यकांत, प्रतिभा व राहुल भांडे-पाटील यांनी आनंदोत्सव साजरा केला.