शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

राज्यात पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंप !

By admin | Published: January 10, 2016 12:53 AM

चंद्रकांतदादा : म्हसवडमध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण

म्हसवड : ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून राज्यातील तीस हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प आहे. राज्यात विजेचा तुटवडा असून, पाणी असूनही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंपाचे वाटप करण्यात येईल,’ अशी घोषणा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनतर्फे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत नूतन बंधाऱ्याचे भूमिपूजन व पुळकोटी येथील गलांडे वस्तीवरील बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष विजय धट, फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील, जयेश मोदी, रेखा कुलकर्णी, जवाहर देशमाने उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांना आधुनिक बी-बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कमी पाण्यावर शेती करण्यासाठी मागेल त्याला ठिबक सिंचन, गावोगावी शेतीमाल प्रक्रिया केंद्र, गोदाम, शीतगृह तसेच पणनच्या माध्यमातून शेतीमालाला दर मिळवून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणदेशी फाउंडेशनचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.’ आमदार गोरे म्हणाले, ‘सध्याच्या शासनाने जलयुक्त शिवारच्या नावाखाली कामे सुरू केली आहेत. याची सुरुवात माणच्या मातीतून झाली, याचा अभिमान आहे. माणच्या मातीत रुजलेली संकल्पना सरकारने दुष्काळ निवारणाच्या कार्यात स्वीकारली याचा आनंद वाटतो.’ चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘२०१२ चा भीषण दुष्काळ आपणाला खूपकाही शिकवून गेला. येथील शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये. म्हणून पावसाचा थेंबन्थेंब अडवण्याचे ठरविले. त्यासाठी म्हसवड परिसरातील सतरा नाला बंधाऱ्यांतील गाळ काढला. सहा ठिकाणी पाणी साठवण सिमेंट बंधारे बांधले. यामध्ये सुमारे सात ते दहा कोटी लिटर पाणीसाठा झाला.’ यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, नितीन दोशी, वसंत मासाळ, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब मासाळ, डॉ. राजेंद्र खाडे, बाळासाहेब मदने, दिलीप तुपे, किशोर सोनवणे, अप्पा पुकळे, ताराबाई साठे, प्रतिभा लोखंडे, रंजना रसाळ, मारुती वीरकर, बबन अब्दागिरे, सुरेश म्हेत्रे, रवींद्र वीरकर, सूरज ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)