लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी मधुमक्षिकापालन करीत आहे. त्यांच्यामुळेच सह्याद्रीच्या कुशीतील मधमाश्यांचा अधिवास आजही जिवंत आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मधुमक्षिका पालन करणाºया दहा मधपाळांचा मधसंचलनालय विभागाच्या वतीने गौरव केला.जागतिक मधुमक्षिका पालन दिनानिमित्त मध संचालनालयाच्या वतीने येथील पालिका सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत खादी व ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांच्या हस्ते मधपाळांचा गौरव झाला.कार्यक्रमास बाळासाहेब भिलारे, तालुका वनाधिकारी रणजीत गायकवाड, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बनसोडे, संचालक माधव दराडे, रसायनशास्त्रज्ञ डी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.मधमाश्या पालन करणारे मधपाळ हे खºया अर्थाने मध, मेण याचे उत्पादन घेत निसर्गाचे सवंर्धन व संरक्षण करीत आहेत. महाबळेश्वर या एकाच तालुक्यात हजारो लोक या व्यवसायात आहेत. आठ ते दहा हजार मधमाश्यांच्या पेट्या येथील मधपाळांकडे आहेत. वसाहती निर्माण करून मधमाश्यांची संख्या वाढविण्यासाठी हे मधपाळ पन्नास वर्षांपासून कार्यरत आहेत. डोंगर दºयात राहणाºया या शेतकºयांनी मधमाश्यांचा अधिवास जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत.यावेळी बाळासाहेब भिलारे, महादेव जाधव, रणजित गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित शेतकºयांना मधमाशी संवर्धन, संगोपन व संरक्षणाची शपथ देण्यात आली. माधव दराडे यांनी प्रास्तविक केले तर डी. आर. पाटील यांनी आभार मानले.अनुदानाची योजना मंजुरीच्याअंतिम टप्प्यात : बिपीन जगताप‘मधपाळांना मार्गदर्शन करताना खादी व ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप म्हणाले, ‘महाबळेश्वर तालुक्यातील सर्व मधपाळांनी मधमाश्यांना जगविले आहे. त्यांचा प्रचार-प्रसार केला आहे. या सर्व मधपाळांनी केलेले काम सामाजिक कार्य आहे. राज्य शासन मधमाश्यापालन योजनेबाबत सकारात्मक आहे. मधमाश्यांसाठी पन्नास टक्के अनुदानाची योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. राज्यात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील सर्व भागात ही योजना राबविली जाणार आहे,’ असेही ते म्हणाले.
मधमाश्यांसाठी पाच दशके झटणाºया मधपाळांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:07 PM