लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ऊसतोडणी वाहतूकदारांना कोंडून ठेवल्याप्रकरणी कृष्णा कारखान्याच्या तत्कालीन कृषी अधिकाºयासह पाचजणांना एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथमवर्ग न्या. आर. टी. घोगले यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली.कृषी अधिकारी सुजय विलासराव पवार (रा. रेठरे बुद्रुक, ता. कºहाड), जयवंत तातोबा थोरात (रा. साळशिरंबे, ता. कºहाड), बाबासाहेब दिनकर पाटील रा. नांदगाव, ता. कºहाड), जुबेर आलम मुल्ला (रा. म्हासोली, ता. कºहाड), सुपरवायझर उमाजी बाबूराव सूर्यवंशी (रा. शेवाळेवाडी, ता. कºहाड) अशीशिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. किशोर दिनकर डांगे (रा. वाघेरी, ता. कºहाड) यांनी डिसेंबर २०११ मध्ये याबाबतची फिर्याद कºहाड तालुका पोलिसांत दिली होती.
वाघेरी येथील किशोर डांगे यांचा ट्रक आहे. हा ट्रक किशोर यांचे मित्र संजय पिसोत्रे (रा. कर्नाटक) यांनी २०११-१२ च्या गळीत हंगामात कृष्णा कारखान्याला ऊस वाहतूक व तोडणी मजुरीसाठी लावला होता. त्याबाबतचा साडेचार लाखांचा करार त्यांनीकृष्णा कारखान्याशी केलाहोता.त्यानंतर कराराची रक्कम वसूल न झाल्यामुळे कारखान्याचा तत्कालीन कृषी अधिकारी सुजय पवार याने ट्रकमालक किशोर डांगे यांना बोलावून घेतले. त्याने डांगे यांना कराराची रक्कम भरण्यास सांगितले. त्यावेळी पैसे नसल्यामुळे डांगे यांनी पैसे भरण्यास मुदत मागितली. मात्र,सुजय पवार याने वॉचमन जयवंत थोरात, बाबासाहेब पाटील, जुबेर मुल्ला, सुपरवायझर उमाजीसूर्यवंशी यांना बोलावून घेऊन डांगे यांच्यासह इतर पाच ते सहा ऊस वाहतूकदार व कंत्राटदारांना कारखान्यावर तसेच ओंड येथील गट कार्यालयात कोंडून ठेवले. १३ ते २७ डिसेंबर २०११ या कालावधीत हा प्रकार घडला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कºहाड तालुका पोलिसांनी किशोर डांगे यांच्यासह इतर वाहतूकदार व कंत्राटदारांची सुटका केली. तसेच किशोर डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक तळेकर यांनी केला. तपासाअंती तळेकर त्यांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादरकेले होते. खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. ना. बी. गुंडे यांनी काम पाहिले. यावेळीअकरा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्यमानून न्या. घोगले यांनी पाचही आरोपींना एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावली.तीन कलमांमध्ये शिक्षापाचही आरोपींना न्यायालयाने दोषी धरून कोंडून ठेवल्याप्रकरणी ३ महिने, दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस कोंडून ठेवल्याप्रकरणी ६ महिने व प्रत्येकी पाचशे रुपये दंड तसेच गुप्त ठिकाणी कोंडून ठेवल्याबद्दल एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावली.