शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

‘पाच रुपयांची पैठणी’ विक्रेत्याच्या अंगलट !

By admin | Published: July 25, 2016 10:41 PM

कऱ्हाडात ‘सेल’चे फलक फाडून टाकले : खोट्या जाहिरातबाजीमुळे संतप्त महिला ग्राहक आक्रमक

कऱ्हाड : पाच रुपयांमध्ये पैठणी आणि तीन रुपयांंमध्ये कोणतीही साडी देण्याची जाहिरातबाजी करणाऱ्या कऱ्हाडातील सेलला सोमवारी शेकडो ग्राहकांनी भेट दिली. मात्र, पाच हजारांच्या खरेदीनंतर पाच रुपयांना पैठणी देणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर संतापलेल्या ग्राहकांनी तेथील कामगारांसह मालकालाही फैलावर घेतले. अखेर मालकानेच परिसरात लावलेले सेलचे सर्व फलक फाडून सेल बंद केल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर आक्रमक जमाव तेथून निघून गेला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर नाक्यानजीक मिनार्ती मंगल कार्यालय आहे. या कार्यालयात सोमवारपासून ‘सैराट’ नावाचा कपड्यांचा सेल सुरू करण्यात आला होता. या सेलच्या जाहिराती प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लावण्यात आल्या होत्या. त्यावर पाच रुपयांत पैठणी, तीन रुपयांत कोणतीही साडी, दोन रुपयांत सैराट साडी अशी आॅफर दिली होती. सोमवारी सकाळीच पोस्टर वाहनांवर चिटकविण्यात आले. संबंधित वाहने ज्या-ज्या गावात गेली तेथील महिलांना या सेलची माहिती झाली. पाच रुपयांत पैठणी आणि तीन रुपयांत कोणतीही साडी मिळणार असल्याने कऱ्हाड तालुक्यासह पाटण व ढेबेवाडी खोऱ्यांतील महिलाही खरेदीसाठी कऱ्हाडला आल्या. मंगल कार्यालयात जाऊन त्यांनी पैठणी तसेच साड्यांची पाहणी केली. काहींनी साडी खरेदीही केली. मात्र, पाच हजारांच्या खरेदीनंतर पहिल्या २५ जणांना ही आॅफर दिल्याचे तेथील कामगारांनी महिलांना सांगितले. यावेळी शाब्दिक वाद झाला. आक्रमक झालेल्या महिला तेथून बाहेर आल्या. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आणखी जमाव त्याठिकाणी जमला. त्यांनी सेलच्या मालकाला बाहेर बोलावून घेतले. जाहिरातीप्रमाणे पाच रुपयांत पैठणी द्या, अशी मागणी जमावाने केली. मात्र, त्याला असमर्थता दर्शवित मालकानेच परिसरात लावलेले सेलचे सर्व फलक फाडून टाकले. सेल बंद केल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानंतर आक्रमक जमाव तेथून निघून गेला. (प्रतिनिधी)