शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

श्रावणी सहलीमध्ये पाच हजार बियांचे रोपण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 4:23 PM

मायणी : कलेढोण, ता. खटाव येथील विद्या विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रावण सहल व वनभोजन कार्यक्रमादरम्यान कलेढोण परिसरातील डोंगरावर पाच हजार बियांचे रोपण केले. यामुळे येथील डोंगररांगा हिरव्यागार होण्यास मदत होणार आहे. मुलांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देकलेढोण शाळेचा उपक्रम डोंगररांगा हिरव्यागार होण्यास मदत होणार                         

मायणी : कलेढोण, ता. खटाव येथील विद्या विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रावण सहल व वनभोजन कार्यक्रमादरम्यान कलेढोण परिसरातील डोंगरावर पाच हजार बियांचे रोपण केले. यामुळे येथील डोंगररांगा हिरव्यागार होण्यास मदत होणार आहे. मुलांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

खटाव-माण तालुक्यातील पूर्वेकडील भाग कायम दुष्काळी आहे. याठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे वृक्षाची संख्याही कमी आहे. डोंगररांगा आहेत, पण या ठिकाणी खडक मिश्रीत जमीन असल्यामुळे झाडाची संख्या कमी आहे.

अनेकवेळा शासनाने वृक्ष लागवडीचे उपक्रम हाती घेतले. त्याचा काही ठिकाणी फायदा झाला आहे.  तसेच येथील  कलेढोण भागातील डोंगरावर आजही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच झाडे आहेत. त्यामुळे हा डोंगर झाडाविनाच दिसत असल्यामुळे या विद्यार्थ्यांनी श्रावणी सहल व  वनभोजनादरम्यान खेळण्याचा व खाण्याचा आनंद तर घेतलाच शिवाय पाच हजार बियांचे रोपणही केले.

त्यामुळे येत्या काळात जर या भागात पाऊस झाल्यास नक्कीच या बियांचे रोप तयार होईल व हा डोंगर हिरवागार होण्यास मदत होईल. विद्यार्थी व शिक्षकांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.