शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

मुख्यमंत्र्यांच्या फिक्सिंगमुळे बिदाल हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:52 PM

दहिवडी : ‘माण तालुक्यात जलसंधारणांची कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे बिदाल गावाने गेल्या वर्षी वॉटरकपमध्ये चांगले काम केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी मॅच फिक्सिंग केली. त्यामुळे बिदालचा नंबर हुकला,’ अशी खंत रासपचे अध्यक्ष व दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आशी जाहीर कबुली जानकर यांनी व्यक्त दिली.वॉटरकप स्पर्धेत भाग ...

दहिवडी : ‘माण तालुक्यात जलसंधारणांची कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे बिदाल गावाने गेल्या वर्षी वॉटरकपमध्ये चांगले काम केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी मॅच फिक्सिंग केली. त्यामुळे बिदालचा नंबर हुकला,’ अशी खंत रासपचे अध्यक्ष व दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आशी जाहीर कबुली जानकर यांनी व्यक्त दिली.वॉटरकप स्पर्धेत भाग घेऊन श्रमदान करणाऱ्या भांडवली, मलवडी, आंधळी, कासारवाडी, टाकेवाडी, येळेवाडी, जाधववाडी गावाला मंत्री महादेव जानकर यांनी रविवारी भेट दिली. त्यानंतर जाधववाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे अनिल देसाई, मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, रासपचे भाऊसाहेब वाघ, जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, तालुकाध्यक्ष दादासाहेब दोरगे, खंडेराव जगताप, बबन वीरकर, आप्पा पुकळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली वीरकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पाणी फाउंडेशनचे समन्वयक अजित पवार, शिवाजी महानवर, नवनाथ शिंगाडे, विजूशेठ भोसले, प्रवीण मोरे, पिंटू जगदाळे उपस्थित होते.मंत्री जानकर म्हणाले, ‘मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिझेलसाठी २५ लाख दिले आहेत. मी आणखी २५ लाख द्यायला सांगतो. शासनकडे नवीन योजनेसाठी पैसे नाहीत. त्यामुळे जुनीच कामे दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझे अनेक उद्योगपतीशी चांगले संबंध आहेत. त्यांचा सीएसआर फंड मिळविण्यासाठी प्रयत्न करू. मला माण तालुक्याने जन्म दिला तरी मराठवाड्याने मोठे केले. तुमच्या सहकाºयाशिवाय मी केंद्रीय मंत्री होणार. भविष्यात एक दिवस मंत्री बनूनच येणार. पाणी फाउंडेशनच्या कामाला ताकद देण्यासाठी अक्षयकुमार, प्रियांका चोप्रा यांना आणून त्यांच्या पर्स रिकाम्या करू. सातारा-पंढरपूर रस्त्यासाठी बाराशे कोटी टाकले. भविष्यात दौंड-दहिवडी-बारामती-फलटण रेल्वे सुरू व्हावे. फलटणला विमानतळ व्हावे व आमच्या शेतकºयांची वांगे युरोपला जाईल, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. टेंभू योजना मार्गी लागली. भविष्यात वारुगडपासून कारखेलपर्यंत पाणी योजनेपासून वंचित असलेल्या ३२ गावांला पाणी येण्यासाठी प्रयत्न करू.’जाधववाडीत बहुतांश लोक श्रमदान करुन सकाळी दहाला दुसरीकडे कामाला जातात. पेट्रोल परवडत नाही म्हणून डाळीबांची छाटणीसाठी वाईपर्यंत एकाच गाडीवर ट्रीपलसीट जातात. जिल्हाध्यक्ष मामूंनी लक्षात आणून दिल्यानंतर जानकर यांनी तेल कंपनीच्या अधिकाºयांना निधी देण्याची सूचना केली.यावेळी मालेगाव आयुक्त संगीता धायगुडे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अजित पवार, मामूशेठ वीरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच ॠतुजा निंबाळकर यांनी आभार मानले.प्रत्येक अधिकाºयानं गाव दत्तक घ्यावेमाण तालुक्याला चांगले अधिकारी लाभले आहेत. प्रत्येक अधिकाºयाने एक गाव दत्तक घेतल्यास ६६ गावांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे त्याच्या माध्यमातून २५ बाय १५ या योजनेत अनेक गावांचा समावेश केला जाईल,’ असे आश्वासन दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिले.मंत्री महादेव जानकर यांनी आवाहन करतानच प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे यांनी येळेवाडी तर गटविकास अधिकारी शेलार यांनी जाधववाडी हे गांव कामासाठी दत्तक घेतले.