वाई : वाई पालिकेचा कचरा डेपो नेहमीच समस्येच्या गर्तेत सापडत चालला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पालिका प्रशासनाने मार्च महिन्यापासून बायोमायनिंग प्रकल्पाचे काम सूरू केले आहे़ याठिकाणी कचºयाचे वर्गीकरण करुन कचरा डेपोत फुल, फळ झाडे लावली जाणार आहेत.वाई पालिकेचा औद्योगिक वसाहतीतील सोनापूर येथील कचरा डेपोत अनेक समस्येने ग्रासलेला होता़ पालिकेने ठेकेदार नेमून शहरातून कचरा ओला-सुका कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे, कचºयापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत तयार करणे असे प्रकल्प सुरू केले. तरीही अपेक्षित उद्दिष्ठ साध्य न झाल्याने ते नेहमी वादाच्या भोव-यात अडकून राहीला आहे. कचरा डेपोला अनेक वेळा आग लागत होती. कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी तसेच धुर पसरल्यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता़ या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पालिका प्रशासनाने नाशिक येथील एका एजन्सीला ठेका देऊन मार्चपासून बायोमायनिंग प्रकल्पाचे काम सुरू केले आहे़ यांतर्गत जुन्या कचºयावर प्रक्रिया करून त्याचे संपूर्ण विलनिकरण करून अविघटनशील कचरा वेगळा केला जाणार आहे़ यामधील माती, प्लास्टीक, धातूजन्य, जैविक पदार्थ वेगळे करून पुर्नवापरासाठी पाठविले जाणार आहेत़ यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाणार आहे. यापासून कचरा डेपोमध्ये फुल झाडे व फळ झाडे लावली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पालिकेने ओला-सूका कचरा उचलण्यासाठी व्यवस्था केली आहे. शहरातील नागरिकांना ओला व सुक्या कचºयाचे वर्गीकरण करून देणे़ प्लास्टिकचा वापर करू नये़ बायोमायनिंग प्रकल्पामुळे कचरा डेपोमधील समस्या दूर होणार आहेत. निर्माण होणारे कंपोस्ट खत शेतकºयांसाठी उपलब्ध करून दिले जाईल़ तसेच कचरा डेपोमध्ये फळझाडे, फुल झाडे लावण्यात येणार आहेत,’ अशी माहिती मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी दिली.