शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बासरीच्या मंगल सुरांनी सज्जनगड मंत्रमुग्ध

By admin | Published: February 09, 2015 10:10 PM

दासनवमी संगीत महोत्सव : बंदिश, अभंग गायनाची बरसात

सातारा : श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित दासनवमी संगीत महोत्सवात विवेक सोनार यांच्या बासरीच्या मंगल सूरांनी अन् डॉ. राम देशपांडे यांच्या बहारदार गायनाने अवघा सज्जनगड मंत्रमुग्ध झाला. सज्जनगडावर दासनवमी संगीत महोत्सवाच्या पाचव्या दिवशी संगीत मैफल झाली. विवेक सोनार यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरूवात अप्रचलित असलेल्या राग वाचास्पतीने केली. यानंतर आलाप, जोड व तीन तालातील रचना त्यांनी रसिकांसमोर सादर केल्या. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर साथ केली. विवेक सोनार यांच्या बासरीवादनाने संपूर्ण गडावरील वातावरण कृष्णमय झाले होते.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. राम देशपांडे यांनी राग यमनकल्याणमधील बंदिशीने सुरुवात केली. यामध्ये एक तालाचा तराणा त्यांनी सादर केला. यानंतर समर्थ रामदास रचित ‘इथे का रे उभा, श्रीरामा मनमोहन मेघशामा’ हा अभंग आणि ‘पतीत पावना जानकी जीवना’ हे पद सादर करून वाहवा मिळविली. समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा सादर करून श्रोत्यांना वीररसाची प्रचिती दिली. यानंतर संत तुकाराम रचित ‘आम्ही बिघडलो...’ हा अभंग सादर करून भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. गंधार देशपांडे यांनी गायनाची साथ केली. तन्मय देवचक्के यांनी संवादिनीवर तर प्रशांत पांडव यांनी तबल्यावर साथ केली. संदीप जाधव यांनी पखवाजावर तर माऊली टाकळकर यांनी टाळाची साथ केली. स्वानंद बेदरकर यांनी निवेदन केले. मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०१५ रोशी सायंकाळी ६ वाजता पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. (प्रतिनिधी)