शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

म्हसवडच्या माळरानावर चारा छावणी भरली ,जागतिक परिषद ; बारा देशांतील अधिकारी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 3:49 PM

माणदेशातील म्हसवडच्या माळरानावर रखरखत्या उन्हात उभारलेल्या चारा छावणीत जागतिकस्तरावरील बैठक पार पडली. याला जनावरांचं हंबरणं अन् गळ्यांच्या गुंगरांच्या पार्श्वसंगीत लाभलं होतं.

ठळक मुद्दे म्हसवडच्या माळरानावर चारा छावणी भरली ,जागतिक परिषद ; बारा देशांतील अधिकारी सहभागीघुंगरांचे पार्श्वसंगीत : शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठ अन् रास्त भावावर चर्चा

म्हसवड : माणदेशातील म्हसवडच्या माळरानावर रखरखत्या उन्हात उभारलेल्या चारा छावणीत जागतिकस्तरावरील बैठक पार पडली. याला जनावरांचं हंबरणं अन् गळ्यांच्या गुंगरांच्या पार्श्वसंगीत लाभलं होतं.माणदेशातील दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना पिक लागवड, त्याच्या संगोपनासह शेतीमाल विक्रीस बाजारपेठ व रास्त बाजारभाव इत्यादी सुविधा देण्याच्या उद्देशाने नाबार्डच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी माणदेशी किसान उत्पादक कंपनी स्थापन केली.

याच्या बारा देशांतील कृषीक्षेत्रासह इतर नामवंत २४ कंपन्यां सहभागी घेतला. आवश्यक ती मदत करण्याबाबतचा महत्वकांक्षी निर्णय येथील माणदेशी जनावरांच्या चारा छावणीतच झालेल्या बैठकीत सवार्नुमते शिक्कामोर्फत करण्यात आला.अध्यक्षस्थानी माणदेशी फाउंडेशन व महिला बँकेच्या संस्थापिक अध्यक्षा चेतना सिन्हा होत्या. यावेळी सिंगापूरचे हरिष अगरावाल, भारतातील ओंकार गोंजारी, मयुरेश पुरंदरे, जसमीत वाधवा, संयुक्त अरब अमेरातीचे मरियम अल्मन्सुरी, फिलिपीन्सचे मायरा बकाल्झो, वेनेसा एलियागा, जपानमधील इएजी हरादा, युताका शिमा व युताका ताकाहाशी, हाँगकाँगचे हँडी कुरनियावान, रॉबिन लॉ, अँथनी लाऊ, अमेरिकेतील केथी ली, सिंगापूरचे चुआन चुन सिम, आयलँडचे सियान कोकली, नेदरलॅण्डचे रॉबर्ट वोंक, इंडोनेशियाच्या रुली माईक ओक्टावियाना, मलेशियाचे मी वॉ हॉ, डेनीस लोव, जर्मनीत नदाईन मेनींग, पोलंडचे डेवी वोंक यांच्यासह माणदेशी किसान उत्पादक कंपनीच्या संस्थापिका वनिता पिसे, संचालक प्रभात सिन्हा, सल्लागार वंदना भन्साळी, वनिता शिंदे उपस्थित होत्या.सिन्हा म्हणाल्या, माणदेशात उपलब्ध पाण्यावर ज्वारी, मका, गहु, कांदा कडधान्य या पिकासोबतच डाळीबाच्या बागाही उत्तमरित्या जोपासतात. परंतु शेती मालास अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. मोठे आर्थिक मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी कर्ज बाजारी होत आहेत. यावर उपाययोजना म्हणुन माणदेशी किसान उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे.माणदेशी किसान कंपनीस देश विदेशातील कंपन्यांकडून भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता नाही. कृषी उद्योगातील कंपन्या असून शेतीसाठी आधुनिक बियाणे, किटकनाशके, पिक लागवड व संगोपन तंत्रज्ञान, बाजार पेठेतील संभाव्य कमी-अधिक बाजारभावाचा अंदाज व त्यानुसार पिक लागवड, विना दलाल थेट बाजारपेठ, लहान मोठे व्यापारी, मॉल याची साखळी तयार करणे आवश्यक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर