पालिकेकडून जनजागृतीवर भर
सातारा पालिकेकडून नागरिकांना मास्क वापरण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात आहे. याकामी अतिक्रमण विभागाच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेच्या या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसादही मिळत आहे. मात्र अनेक नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असून, केवळ दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी मास्कचा वापर केला जात आहे.
(चौकट)
या ठिकाणी गर्दी अधिक
शहरातील मोती चौक, खण आळी, राजवाडा परिसर, पाचशे एक पाटी, मध्यवर्ती बसस्थानक, तहसील कार्यालय तसेच सर्व मंडईत मास्क न वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
(कोट)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. लॉकडाऊन नको असेल तर मास्कचा वापर करावा. अन्यथा प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागतील.
- मनोज शेंडे, उपनगराध्यक्ष
(कोट)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. मास्कचा तात्पुरता नव्हे दैनंदिन वापर करावा.
- माधवी कदम, नगराध्यक्षा