सातारा : शहरालगत असणाऱ्या कोडोली येथील चंदननगर परिसरातून सातारा शहर पोलिसांनी ३९ हजार ३६० रुपयांची विदेेशी दारू जप्त केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. राहुल गोडसे आणि महेंद्र चोरगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी चारचाकीही जप्त केली.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, एमआयडीसीतील चंदननगर येथे विदेशी दारू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना राहुल रामचंद्र गोडसे (वय २९, रा. खिंडवाडी, ता. सातारा) आणि महेंद्र नामदेव चोरगे (वय ४६, रा. अश्विनी कॉलनी, गोळीबार मैदान, गोडोली, सातारा) हे दोघेे सापडले. पोलिसांनी या दोघांवर कारवाई करून त्यांच्याकडील ३९ हजार ३६० रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि ५० हजार रुपयांची चारचाकी जप्त केली. या दोघांवर शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.